बातम्या
*गॅस टंचाईबाबत उबाठाचे तहसीलदार समीर माने यांना निवेदन
By Administrator - 3/16/2026 6:11:20 PM
Share This News:
*गॅस टंचाईबाबत उबाठाचे तहसीलदार समीर माने यांना निवेदन
तालुक्यामध्ये व्यावसाईक तसेच घरगुती गॅसच्या तुटवड्याबाबत योग्य उपाययोजना करा*
आजरा (हसन तकीलदार)*:-सध्या अमेरिका व इराक मध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे देशात गॅसची टंचाई आहे असल्याचे चित्र आहे. गॅससाठी रांगाच रांगा लागत आहेत. त्यामुळे आजरा तालुक्यामध्ये सध्या गॅस धारकांच्या रांगा गॅस एजन्सीच्या दारात लागलेल्या आहेत.गॅसचा सुरळीत पुरवठा करणेबाबत शिवसेना उबाठा तर्फे आजरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे
गॅसच्या टंचाईमुळे सर्व सामान्य माणसांचे हाल होत आहेत. तर दुसरीकडे व्यावसाईक गॅस सुद्धा मिळत नसल्याने आजरा शहरासह तालुक्यात हॉटेल व्यवसाय व अन्य बेकरी व्यवसाय बंद असल्याने त्याचा परिणाम नागरिकांच्या खाद्य मिळणेवर होत आहे. त्यामुळे शहरात कामानिमित येणाऱ्या विद्यार्थी व नागरीकांची उपासमार आणि हाल होताना दिसत आहेत.
एकीकडे शासन गॅसचा तुटवडा नाही अशी घोषणा करत असताना दुसरीकडे गॅससाठी लागलेल्या रांगा सर्व सामान्य नागरिक व व्यावसाईक यांचे पुरते हाल होत आहेत. तरी आजरा तालुक्यातील नागरिकांना गॅस पुरवठा सुरळीत करून द्यावा अन्यथा शासनाच्या विरोधात मोर्चा काढण्यात येईल.असा इशारा उबाठा तर्फे निवेदनातून देण्यात आला आहे.
*रमजानसारखा पवित्र मास सुरु आहे दिवसभर रोजे राहून गॅससाठी रांगेत उभे रहाणे त्रासाचे होत आहे. ज्या चहा गाडेवाल्यांचा उदरनिर्वाह चहाच्या गाड्यावर आहे. अशा गरीब व्यावसायिकांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आवासून उभा आहे. मोठ्या हॉटेलधारकांच्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या नोकरांना सुट्टी दिल्याने त्यांच्याही कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न अनुत्तारित आहे. भाडयाने चालवणारे व्यवसायिकांचे व्यवसाय ठप्प आहेत त्यांच्या अंगावर भाडे मात्र पडत आहे.
निवेदनावर तालुकाप्रमुख युवराज पोवार, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, सुयश पाटील, महेश पाटील, संजय येसादे, महादेव गुरव, रोहन गिरी, अमित गुरव आदींच्या सह्या आहेत.
*गॅस टंचाईबाबत उबाठाचे तहसीलदार समीर माने यांना निवेदन
|