बातम्या

*रेल्वे सुरु करा कोल्हापूर जिल्हा राहिवासी सामाजिक संघाची मागणी

Resume train services


By nisha patil - 10/8/2026 12:44:55 PM
Share This News:



*रेल्वे हा आमचा अधिकार आहे, उपकार नाही.

*रेल्वे सुरु करा कोल्हापूर जिल्हा राहिवासी सामाजिक संघाची मागणी
 

*आजरा(हसन तकीलदार):-आजरा - चंदगड - गडहिंग्लज तालुक्याच्या वाट्याला रेल्वेची उपेक्षाच झाली आहे.आजरा- चंदगडचा व्यापर,उद्योग आणि दळण वळणाची बेळगावशी नाळ जोडलेला त्याचबरोबर गडहिंग्लला व्यापार उद्योग ही भर भराटीचा असूनही  अजून पर्यंत रेल्वे का सुरु नाही?मग हा अन्याय किती दिवस सहन करणार?असा सवाल कोल्हापूर जिल्हा रहिवाशी सामाजिक प्रवासी संघाने उपस्थित करीत कोल्हापूर -आजरा -गडहिंग्लज -चंदगड -बेळगाव अशी रेल्वे सुविधा सुरु करण्याची मागणी केली आहे.
 

गडहिंग्लज आजरा - चंदगड तालुके  शिक्षण, उद्योग, व्यापार, शेती आणि सामाजिक जाणीव असलेला भाग म्हणून ओळखला जातो. हजारो विद्यार्थी, डॉक्टर, वकील, व्यापारी, शिक्षक, शेतकरी आणि नोकरदार दररोज कोल्हापूरकडे प्रवास करतात. तरीही स्वस्त, सुरक्षित आणि कायमस्वरूपी रेल्वे सुविधा आजही नाही.
 

हा विकासाचा प्रश्न आहे की राजकीय इच्छाशक्तीचा अभाव? जेव्हा मतांची गरज असते, तेव्हा प्रत्येक नेता गडहिंग्लजला विकासाचे स्वप्न दाखवतो. पण निवडणूक संपली की रेल्वेचे आश्वासनही संपते.
गडहिंग्लजची जनता सुशिक्षित आहे, पण तिच्या संयमाचा गैरफायदा घेतला जात आहे का?

 

जर या मार्गावर दररोज हजारो लोक प्रवास करत असतील, तर रेल्वे का नाही?
जर शक्तिपीठ महामार्गासाठी लाख कोटींची तयारी होऊ शकते, तर गडहिंग्लज–कोल्हापूर रेल्वेसाठी दशकानुदशके फक्त सर्व्हे आणि घोषणा का?
जनतेचा स्पष्ट प्रश्न आहे—आजरा - चंदगड -
गडहिंग्लज, ला रेल्वे नाकारण्यामागचे कारण काय?
विकासाचे निकष वेगळे आहेत का?

 

की या भागातील जनतेचा आवाज दुर्लक्षित केला जात आहे? बेळगांवचे तत्कालीन खासदार कै .सुरेश अंगडी यांनी या प्रश्नावर वेळोवेळी प्रकाश झोत देऊन अनेक वेळा तारांकीत प्रश्न म्हणून आवाज उठवला परंतू त्यांच्या पश्चात रेल्वेच्या प्रश्नावर आमदार - खासदार यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेचे दिस आहे .
 तरी तिन्ही तालुक्यातील जनतेने रेल्वेसाठी एकत्र येणे गरजेचे आहे. आता व्यक्तींसाठी नव्हे तर विकासासाठी एकत्र या.शाहू महाराजांचे नाव घेणाऱ्यांना त्यांचे रेल्वे स्वप्न पूर्ण करण्याची आठवण करून द्या.असे आवाहन कोल्हापूर जिल्हा राहिवासी सामाजिक प्रवासी संघाने केले आहे.


*रेल्वे सुरु करा कोल्हापूर जिल्हा राहिवासी सामाजिक संघाची मागणी
Total Views: 10