बातम्या
श्री संजय गुजर याचा सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभ संपन्न्
By nisha patil - 7/9/2026 4:57:51 PM
Share This News:
श्री संजय गुजर याचा सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभ संपन्न्
कोल्हापूर दि. 4 : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजी या शाखेवरून श्री संजय शिवाजीराव गुजर, हे कार्यालयीन अधीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले त्यांची एकूण सेवा पस्तीस वर्षे चार महिने इतकी झाली या प्रसंगी कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ. श्रुती जोशी यांच्या हस्ते संस्थेचे सन्मानचिन्ह व कॉलेजचे सेवा गौरव सन्मानपत्र देण्यात आले याप्रसंगी त्यांनी त्यांच्या कार्याचा, प्रशासनाचा, परस्पर सहकार्य ,सेवाभावी वृत्ती , इ. गुण आम्हा सर्वांनाच नेहमी प्रेरणा देत राहतील याचा उल्लेख केला .
व्यक्तिगत हितापेक्षा संस्थेच्या व शाखेच्या हितासाठी आपण आजपर्यंत काम करीत आलो आहोत असे सेवानिवृत्ती प्रसंगी श्री संजय गुजर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मोहन यादव, नीलम कुमार चौधरी, बळवंत खंडागळे, धीरज शिंदे ,सुधाकर इंडि, मिनाज नायकवडी यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी कॉलेजचा सर्व स्टाफ उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा पैलवान व आभार प्रा. स्वाती हळवणकर यांनी केले.
श्री संजय गुजर याचा सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभ संपन्न्
|