बातम्या
दाभील ता.आजरा येथे भात पीक नैसर्गिकशेती शेतीशाळा कार्यक्रम संपन्न*
By nisha patil - 7/13/2026 11:49:30 PM
Share This News:
**दाभील ता.आजरा येथे भात पीक नैसर्गिकशेती शेतीशाळा कार्यक्रम संपन्न*
**आजरा(हसन तकीलदार)*:-आज दिनांक 13 जुलै 2026 रोजी पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून "माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" या उपक्रमांतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत खरीप हंगाम भात पीक नैसर्गिकशेती शेतीशाळेचे कार्यक्रम मौजे दाभिल तालुका आजरा येथे आज आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमात तानाजी निकम (शेती अधिकारी,कृषी विज्ञान केंद्र कणेरी मठ यांनी नैसर्गिक शेतीचे महत्व विषद केले.
शेणखत,कंपोस्ट खत याचे फायदे तसेच जमिनीतील कार्बनचे प्रमाण वाढवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत माहिती दिली.विविध नैसर्गिक निविष्ठांचे प्रकार ते तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, वापरण्याची पद्धत याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. त्यांनी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून जीवामृत तयार करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कृषी विभागाचे अमित यमगेकर (सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा)यांनी स्वागत व प्रस्ताविक केले.नामदेव पाटील यांनी आभार मानले.यावेळी मोहन फुले (मंडळ कृषी अधिकारी उत्तुर),नागेश काळे( सहाय्यक कृषी अधिकारी), कमलाकर पाटील, पुंडलिक पाटील, रेश्मा पाटील, भाग्यश्री पाटील,सविता पाटील आदीसह भागातील व गावातील शेतकरी उपस्थित होते.
दाभील ता.आजरा येथे भात पीक नैसर्गिकशेती शेतीशाळा कार्यक्रम संपन्न*
|