बातम्या

रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये पावसाळी वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न*

Rosery english school 2


By nisha patil - 7/27/2026 12:56:39 PM
Share This News:



**रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये पावसाळी वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न*

आजरा(हसन तकीलदार)*__ : रोझरी इंग्लिश स्कूल, आजरा येथे सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या पावसाळी वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. सलग कोसळणाऱ्या पावसातही विद्यार्थ्यांचा उत्साह, जिद्द आणि खिलाडूवृत्ती पाहण्यासारखी होती.या विविध मैदानी खेळामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख पाहुण्या सिस्टर रिटा उपस्थित होत्या. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्या म्हणाल्या, "विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जीवनात खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक सुदृढता आवश्यक असून, निरोगी शरीरातच निरोगी मन वास करत असते.निरोगी तन शिक्षित मन हे खरे धन आहे. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर शाळेचे मॅनेजर मेल्विन पायस, फादर वॉल्विन फर्नांडिस, मुख्याध्यापक मनवेल बार्देसकर, पर्यवेक्षक विजय केसरकर आणि क्रीडा शिक्षक संतोष कदम यांच्या हस्ते शाळेचे विद्यार्थी प्रतिनिधी व क्रीडा प्रतिनिधींना क्रीडा मशाल सुपूर्द करण्यात आली. यावेळी दोन दिवसीय क्रीडा स्पर्धांना औपचारिक प्रारंभ झाला. सर स्टीफन डिसोझा यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ दिली.

मुख्याध्यापक मनवेल बार्देसकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना क्रीडास्पर्धांचे महत्त्व विशद केले. "खेळामुळे शिस्त, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सांघिक भावना विकसित होते. प्रत्येक विद्यार्थ्याने विजयाइतकाच सहभागालाही महत्त्व द्यावे," असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पावसाची संततधार सुरू असतानाही विद्यार्थ्यांनी विविध वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मैदानावर खिलाडूवृत्ती, संघभावना आणि जिद्दीचे सुंदर दर्शन घडले. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रयत्नाला शिक्षकांनी दिलेले प्रोत्साहनही विशेष उल्लेखनीय ठरले.

या स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शैलजा कांबळे यांनी केले, तर आशिष फर्नांडिस यांनी उपस्थितांचे आभार मानले.


रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये पावसाळी वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न*
Total Views: 454