बातम्या

विवेकानंद कॉलेजच्या सागर इंगोले यांना पीएच.डी.

Sagar Ingole of Vivekananda College awarded Ph D


By nisha patil - 10/8/2026 12:28:45 PM
Share This News:



विवेकानंद कॉलेजच्या सागर इंगोले यांना पीएच.डी.

 कोल्हापूर दि. 10 : विवेकानंद महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाचा संशोधक विद्यार्थी  सागर सुधाकर इंगोले यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरची भौतिकशास्त्र विषयातील पीएच.डी. पदवी प्राप्त झाली आहे. त्यांचा पीएचडी प्रबंधाचा विषय "फॅब्रिकेशन ऑफ ट्रान्सपरंट सिलिका बेस्ड सेल्फ-क्लीनिंग सुपरहायड्रोफोबिक कोटिंग्स फॉर सोलर सेल कव्हर ग्लास एप्लिकेशन" होता. या संशोधनासाठी त्यांना विवेकानंद महाविद्यालयाचे डॉ. संजय सुभाष लठ्ठे यांचे मार्गदर्शन लाभले.

कु. सागर सुधाकर इंगोले यांनी सोलर पॅनेलच्या पृष्ठभागावर सुपरहायड्रोफोबिक गुणधर्म असलेली सिलिका नॅनोपार्टिकलचा वापर करून विशेष कोटिंग्ज विकसित केले. या कोटिंग्जमुळे पृष्ठभागावरील धूळ, घाण व सेंद्रिय प्रदूषके पाण्याच्या साहाय्याने आपोआप दूर होण्यास मदत होते. तसेच पावसाचे पाण्याच्या साहाय्याने पृष्ठभाग स्वच्छ राहण्याची क्षमता वाढते.

या संशोधनासाठी त्यांना डॉ. संजय सुभाष लठ्ठे यांचे मार्गदर्शन लाभले. कु. सागर सुधाकर इंगोले यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षच्या डॉ. श्रुती जोशी तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे,  सीईओ श्री. कौस्तुभ गावडे, आणि प्रबंधक श्री.सचिन धनवडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


विवेकानंद कॉलेजच्या सागर इंगोले यांना पीएच.डी.
Total Views: 13