बातम्या

गणेशचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आधारित सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे नगरपंचायतीला निवेदन

Samajik Seva Pratishthan submits memorandum


By nisha patil - 9/9/2026 12:44:49 AM
Share This News:



गणेशचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आधारित सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे नगरपंचायतीला निवेदन
 

*आजरा(हसन तकीलदार)*:-सामाजिक सेवा प्रतिष्ठान आजरा प्रणीत अन्याय निवारण समिती, आजरा यांच्या शिष्टमंडळाने आज आजरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांची भेट घेऊन गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मार्गाची तातडीने दुरुस्ती, अतिक्रमण, बेकायदेशीर पार्किंग व इतर अडथळे दूर करण्याबाबत सविस्तर निवेदन दिले.

      निवेदनात समितीने नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत काही मागण्या केल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने आगमन व विसर्जन मार्गाची तात्काळ संयुक्त पाहणी.अपूर्ण रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजविण्यात यावे .अतिक्रमण व बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई व्हावी.
 

भटके कुत्रे,घोडे, गाई व इतर जनावरांवर उपाय करा.नगरपंचायत व पोलीस विभागाने संयुक्त वाहतूक नियोजन करावे.विसर्जन मार्गावर स्वच्छता, प्रकाश व सुरक्षा व्यवस्था पूर्ण करावी.
समितीने “आश्वासन नको, प्रत्यक्ष कार्यवाही हवी” अशी ठाम भूमिका मांडत नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची मागणी केली.

 

निवेदन देताना अध्यक्ष तथा नगरसेवक  परशुराम बामणे, नगरसेविका डॉ. स्मिता कुंभार, सचिव  पांडुरंग सावरतकर, उपाध्यक्ष गौरव देशपांडे,  बंडोपंत चव्हाण, जोतीबा आजगेकर, जावेदभाई पठाण,  अतूल पाटील तसेच समितीचे इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.


गणेशचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आधारित सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे नगरपंचायतीला निवेदन
Total Views: 183