राजकीय

लक्षवेधी आंदोलक संजय पाटील यांचा शिवसेना (शिंदे गट ) पक्षांमध्ये प्रवेश 

Sanjay Patils entry into Shiv Sena


By Administrator - 1/19/2024 6:57:28 PM
Share This News:लक्षवेधी आंदोलक संजय पाटील यांचा शिवसेना (शिंदे गट ) पक्षांमध्ये प्रवेश 

 राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष  राजेश क्षीरसागर   यांच्या उपस्थितीत  शनिवारी होणार पक्षप्रवेश 
 
पक्षप्रवेशाचा  कार्यक्रम शिवालय येथे शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात होणार 

 

कोल्हापूर : संजय पाटील हे गेले २२ वर्षे त्याच्या धडाकेबाज कार्यासाठी प्रसिद्ध आहेत संजय पाटील हे   जनसुराज्य शक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते तसेच अखिल भारतीय किसान काँग्रेस पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेले आहे याचबरोबर  त्यांनी महाराष्ट्र पोलीस मित्र संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी देखील विशेष काम केलेले आहे 

संजय पाटील यांच्या  नेतृत्वाखाली राज्यपातळीवर तीन कामगार संघटना काम करत असून  त्या संघटनांचे ते प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतात त्यांच्या या सर्व ठिकाणच्या कामाची तसेच, त्यांच्या  संघटना यांनी केलेल्या कार्याची दखल शिवसेना (शिंदे गट) पक्षाने घेऊन त्यांना शिवसेना पक्ष बळकट करणेसाठी पक्षात प्रवेश दिला आहे संजय पाटील यांच्या संघटना ,कार्यकर्ते पदाधिकारी राज्यभर आहेत त्या सर्व संघटना शिवसेना पक्षाशी  संलग्न केल्या जाणार आहेत

संजय पाटील यांनी गेल्या 22 वर्षात 500 हून अधिक आंदोलने केलेली आहेत जनसामान्यांच्या, कष्टकऱ्यांच्या,वंचितांच्या, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या प्रश्नावर त्यांनी लक्षवेधी आंदोलन केलेली आहेत.  शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार, काळाबाजार या विरोधात त्यांनी टोकाची लढाई लढलेली असून आजपर्यंत त्यांनी 13 अधिकारी निलंबित केलेले आहेत ,त्याचबरोबर 18 रेशन धान्य दुकानदाराचे परवाने   रद्द करण्यास भाग पाडले आहे या त्यांच्या कामाची नोंद घेऊन शिवसेना त्यांना लवकरच मोठी जबाबदारी देणार आहे, त्यांनी परिवर्तन संघटना स्थापन करून मुदतबाह्य औषध घोटाळा बाहेर काढला जो  राज्यभर गाजला त्याचबरोबर मोठा रेशन वरील गहू घोटाळा त्यांनी बाहेर काढला हे दोन्ही प्रश्न विधानसभेत गाजले त्यांच्या शिवसेना प्रवेशाने कोल्हापुरातील शिवसेना अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे

असे लक्षवेधी आंदोलक संजय पाटील शनिवारी शिवसेना शिंदे गटात शेकडो समर्थकांसह प्रवेश करत असून या कार्यक्रमासाठी माजी आमदार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष नामदार राजेश क्षीरसागर ,जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण ,महानगर प्रमुख शिवाजीराव जाधव, दक्षिण शहर प्रमुख महेंद्र घाडगे ,उत्तर शहर प्रमुख रणजित  जाधव यांची उपस्थिती असणार आहे
 


लक्षवेधी आंदोलक संजय पाटील यांचा शिवसेना (शिंदे गट ) पक्षांमध्ये प्रवेश