बातम्या
*आंबोलीच्या महादेवगड पॉईंटवरून कोसळलेल्या पर्यटकाची दुसऱ्या दिवशी शोध मोहीम जारी
By nisha patil - 5/8/2026 12:41:04 PM
Share This News:
*आंबोलीच्या महादेवगड पॉईंटवरून कोसळलेल्या पर्यटकाची दुसऱ्या दिवशी शोध मोहीम जारी
*सह्याद्री ऍडव्हेंचर रेस्क्यु टीमने सुरु केली शोध मोहीम
*आजरा(हसन तकीलदार):-बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुका रा. जत्राट येथील डॉ. आयुब सय्यद (वय 45)हे आंबोली येथे वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आले असता महादेवगड पॉईंटवरून सुमारे 400 फूट खोल दरीत पाय घसरून पडून भिषण अपघात झाल्याची दुर्दैवी आणि मनहेलावणारी घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
डॉ. अयुब सय्यद हे आपल्या सहकाऱ्यासमवेत मंगळवारी सकाळी आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी आले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास महादेवगड पॉईंट परिसरात असताना ते लघुशंकेसाठी दरीच्या बाजूला असलेल्या सुरक्षेच्या रेलिंगवरून पलीकडे गेले. याच दरम्यान त्यांचा अचानक तोल जाऊन 400 फूट खोल दरीत कोसळले. पॉईंटजवळ मक्याची कणसे भाजून विकणाऱ्या स्थानिक विक्रेत्याने त्यांना दरीत पडताना पाहिले आणि तात्काळ त्यांच्या सहकाऱ्यांना सांगितले. याबाबत घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आपल्या सहकाऱ्यासमवेत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंबोलीतील सह्याद्री ऍडव्हेंचर रेस्क्यू टीमला मदतीसाठी पाचारण केले.
शोधमोहीम तात्काळ सुरु करण्यात आली परंतु संततधार पाऊस, दाट धुके आणि अंधारामुळे सायंकाळी सातच्या सुमारास ही शोधमोहीम तात्पुरती थांबवावी लागली. या प्रतिकूल परिस्थितीमुळे मंगळवारी सायंकाळी थांबवण्यात आलेली शोधमोहीम आज बुधवारी सकाळी लवकर पुन्हा सुरु करण्यात आली आहे अशी माहिती सह्याद्री ऍडव्हेंचरचे सदस्य सुजिथ वेल्लीयायी यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली.
*आंबोलीच्या महादेवगड पॉईंटवरून कोसळलेल्या पर्यटकाची दुसऱ्या दिवशी शोध मोहीम जारी
|