बातम्या

सी.आर.सी. 11 अंतर्गत दुसरी शिक्षण परिषद संपन्न

Second Education Conference held under CRC 11


By nisha patil - 8/31/2026 8:43:44 PM
Share This News:



सी.आर.सी. 11 अंतर्गत दुसरी शिक्षण परिषद संपन्न

; वाय.पी. पोवार विद्यालय, पंत वालावलकर हायस्कूल आणि सृजन आनंद विद्यालय यांचे नेटके आयोजन                    

  कोल्हापूर  :   सी.आर.सी.11 अंतर्गत दुसऱ्या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन वाय.पी.पोवार विद्यालय, शां. कृ.पंत वालावलकर हायस्कूल आणि सृजन आनंद विद्यालय यांचे वतीने मुक्तसैनिक वसाहतीमधील सृजन आनंद विद्यालयात करण्यात आले होते . यावेळी प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर, जाधववाडी अंतर्गत असणाऱ्या पंधरा शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते . या शिक्षण परिषदेमध्ये एकूण पाच सत्रांमध्ये विविध शैक्षणिक उपक्रम आणि शासन परिपत्रके व शालेय प्रशासनाची भूमिका यावरती उहापोह करण्यात आला .

प्रारंभी पहिल्या सत्रात प्रिन्स शिवाजी विद्यामंदिरचे मार्गदर्शक शिक्षक संतोष कुमार कदम यांनी मागील परिषदेचा आढावा घेतानाच प्रशस्त ॲप, माध्यान भोजन, इको क्लब स्थापन करणे, विद्यार्थी समूह संघ स्थापन करणे, ड्रॉपबॉक्स रिकामा करणे, विद्याजंली पोर्टलवर उपस्थिती नोंद करणे, युडायस पोर्टल अद्ययावत करणे यासंदर्भातील उपयुक्त माहिती दिली . दुसऱ्या सत्रात वालावलकर हायस्कूलच्या निशिगंधा पाटील यांनी संप्रेषण आणि विचारांची शैक्षणिक आदान प्रदानता तसेच वर्गातील दैनंदिन समस्येवर भाष्य केले . तिसऱ्या सत्रात तेजस्विनी जौंदाळ यांनी आशयाच्या आधारे पाठनियोजन आणि त्यावरील उपाय यावरती भाष्य केले . चौथ्या सत्रात वाय .पी. पोवार विद्यालयाच्या दीपाली मोरे यांनी पालक, शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक समुदाय सहभाग तसेच खान ॲकॅडमी संदर्भातील शाळांची नोंदणी याबाबत विस्तृत विवेचन केले . पाचव्या सत्रात वंदना चोथे यांनी शैक्षणिक धोरणे आणि शिक्षक जागृतता यावरती विचार मंथन केले . रोहिणी येडगे यांनी आभार प्रदर्शन केले . यावेळी संयोजक मुख्याध्यापक मारुती शिणगारे, संजय सौंदलगे, रमेश कांबळे यांचा तसेच मार्गदर्शिका निशिगंधा पाटील, तेजस्विनी जौंदाळ, वंदना चोथे, दीपाली मोरे यांचा सत्कार सीआरसी प्रमुख मुख्याध्यापक नितीन चौगुले यांचे हस्ते करण्यात आला .

शिक्षण परिषद यशस्वितेसाठी अधिकारी आसमा पठाण, श्रावण कोकितकर तसेच प्रशासन अधिकारी जयश्री जाधव यांचे प्रोत्साहन लाभले . या परिषदेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याने उपस्थित शिक्षकांतून समाधान व्यक्त करण्यात आले .


सी.आर.सी. 11 अंतर्गत दुसरी शिक्षण परिषद संपन्न
Total Views: 140