बातम्या
ज्येष्ठ नागरिक हे कुटुंबा बरोबरच समाजाचा आधारवड होत. -अभिजीत खतकर.
By nisha patil - 5/8/2026 12:32:55 PM
Share This News:
ज्येष्ठ नागरिक हे कुटुंबा बरोबरच समाजाचा आधारवड होत. -अभिजीत खतकर.
स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंच चे उद्घाटन.
तारा न्युज प्रतिनिधी अजित बोडके कोल्हापूर:ज्येष्ठ नागरिक हे कुटुंबा बरोबरच समाजाचा आधारवड होत.त्यांची उतारवयात आबाळ होऊ नये या साठी त्यांची कुटुंबीयां बरोबरच जबाबदार मंडळीनी त्यांना आधार देत काळजी घेणे सर्वांचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन नगरसेवक अभिजीत खतकर यांनी केले.
जिवबानाना जाधव पार्क येथे स्वातंत्रवीर वि.दा.सावरकर ज्येष्ठ नागरिक विचार मंचच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे ते बोलत होते. अध्यक्षस्थानी यशराज पावसकर होते प्रमुख उपस्थिती ॲड.संगीता तांबे, फेस्कॉमचे सल्लागार एन. एस. पाटील उपस्थित होते. अभिजीत खतकर म्हणाले ज्येष्ठांच्या अडी अडचणी सोडवण्या बरोबरच त्यांना विसावा म्हणून लवकरच त्यांच्या प्रभागांमध्ये विरंगुळा केंद्र उभारणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.
ज्येष्ठ पत्रकार एन. एस. पाटील यांनी ज्येष्ठांच्या अडीअडचणी व कुटुंबा बरोबरच समाजामध्ये होत असलेली आबाळ व कुटुंबीयांनी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.तसेच ज्येष्ठा साठी असणा-या विविध शासकीय योजना सोयी सवलती या विषयी मार्गदर्शन करून याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
स्वा.सावरकर विचार मंचच्या डिजिटल फलकाचे अनावरण अभिजीत खतकर, यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास दिलिप बोगार, भीमराव काटकर, नागेश यादव, रामदास सोरटे, अर्जुन पाटील, गणेश यादव, अरविंद गुरव, किरण शिंदे, हिम्मत पठाण,धनाजी पताडे,विठ्ठल कांबळे, पोपटराव कांबळे, सुनंदा कुलकर्णी, मंगल पवार ,भाग्यश्री पावसकर ,नंदिनी यादव, दैवता पाटील आदी उपस्थित होते आभार आनंदा गडकरी यांनी मांडले
ज्येष्ठ नागरिक हे कुटुंबा बरोबरच समाजाचा आधारवड होत. -अभिजीत खतकर.
|