बातम्या

भूत भविष्याचा विचार न करता ज्येष्ठांनी वर्तमानात आनंदी जगावे. :बंडोपंत खोत.

Seniors should live happily in the present


By nisha patil - 8/13/2026 2:41:42 PM
Share This News:



भूत भविष्याचा विचार न करता ज्येष्ठांनी वर्तमानात आनंदी जगावे. :बंडोपंत खोत.
 

राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक संघ आयोजित कार्यक्रम.
 

 तारा न्यूज प्रतिनिधी अजित बोडके कोल्हापूर:भूत भविष्याचा विचार न करता ज्येष्ठांनी वर्तमानात आनंदी जगावे कारण भूतकाळात  घडलेल्या ब-या वाईट घटनांमुळे वर्तमान जीवनातील आनंदावर विरजन पडते परिणामी आजचा आनंद आपण गमावून बसतो म्हणूनच उगवणा-या नव्या दिवसाचे आनंदाने स्वागत करत मजेत रहा असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते बंडोपंत खोत यांनी केले. 
     

राजर्षी शाहू जेष्ठ नागरिक सेवा संघ कोल्हापूर,आयोजित ज्येष्ठांच्या आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष कावजी कदम होते. प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ पत्रकार एन.एस. पाटील, उपाध्यक्ष के.बी. गुरव निवृत्त न्यायालयीन अधीक्षक आर.डी. कांबळे होते 
     

खोत पुढे म्हणाले ज्येष्ठ नागरिकांनी उमेदीत कुटुंब व समाजासाठी योगदान दिलेले असते.त्यांचे कुटुंबीया बरोबरच समाजावर उपकार असतात.त्यांची उतार वयात आबाळ होवू नये याची काळजी सर्वानी घेणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे.ज्येष्ठांनीही आपल्या आवडी निवडी सांभाळात व्यसनापासून दूर राहात समतोल आहार ,नियमित व्यायाम व योग करावा जिभेवर खडीसाखर व डोके शांत ठेवून सर्वांशी ऍडजेस्टमेंट करत रहावे म्हणजे जीवन हे आनंददायी बनेल असाही त्यांनी सल्ला दिला.
 

   संघाचे कोषाध्यक्ष आर.डी. नार्वेकर यांनी या वेळी मानवी जीवनातील योगाचे महत्व, उतार वयात ज्येष्ठांनी करावयाचे व्यायाम प्रकार व आहार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
     

कार्यक्रमास डॉ.प्रकाश पाटील,आर. एस. पाटील, बाबूराव पोर्लेकर,अशोकराव कांबळे,प्रमोद पाटील,ज्येष्ठ धावपट्टू परशुराम नांदवडेकर, मनीषा पत्रावळे, अशोकराव देशमुख,सुरेश मिरजकर, शोभा पोर्लेकर,गौराबाई लोहार, आदी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते आर. डी. कांबळे यांनी आभार मानले.
 

 


भूत भविष्याचा विचार न करता ज्येष्ठांनी वर्तमानात आनंदी जगावे. :बंडोपंत खोत.
Total Views: 37