बातम्या

शहाजी महाविद्यालयात साहित्य, संस्कृती आणि समाज यामधील कुटुंब व्यवस्था यावर राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न 

Shahaji college 9


By nisha patil - 3/15/2026 5:18:45 PM
Share This News:



कुटुंबात स्वातंत्र्य, समता,बंधुता हवी : डॉ. रघुनाथ कडाकणे. 

वर्तमानातील कुटुंबाचे साहित्यात प्रतिबिंब पडावे :डॉ. सुनीलकुमार लवटे

शहाजी महाविद्यालयात साहित्य, संस्कृती आणि समाज यामधील कुटुंब व्यवस्था यावर राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न 

कोल्हापूर : कुटुंब हा समाजाचा प्राथमिक घटक आहे. कुटुंबामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता पाहिजे.तरच ते कुटुंब आधुनिक आणि उदारमतवादी म्हणता येईल. प्रत्येक कुटुंबाचे संविधान गरजेचे आहे असे प्रतिपादन राजाराम महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. रघुनाथ कडाकणे यांनी केले. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील इंग्रजी विभाग वआय. क्यू. ए.सी.यांच्या वतीने आज साहित्य, संस्कृती आणि समाज यामधील कुटुंब व्यवस्था यावर अंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न झाले. याप्रसंगी बीज भाषणात ते बोलत होते. 

  वर्तमान काळातील कुटुंबाचे प्रतिबिंब साहित्यामध्ये उमटले पाहिजेत. साहित्यामध्ये कुटुंबांचे प्रश्न, समाजाचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न असावेत असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व लेखक डॉ.सुनीलकुमार लवटे यांनी केले. या चर्चासत्रातील उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख उद्घाटक म्हणून बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 

प्रारंभी वृक्षाला जलारपन करून या चर्चासत्राचे उद्घाटन झाले. संशोधकांनी लिहिलेल्या संशोधन पेपरच्या प्रोसीडींग चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

   श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे या उपक्रमास मार्गदर्शन, प्रोत्साहन मिळाले .

  इंग्रजी विभागाने तयार केलेल्या भिंतीपत्रकाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.

 डॉ.कडकणे यांनी, कुटुंब व्यवस्थेचा आढावा घेताना मानवाच्या उत्क्रांतीपासूनची कृषी व्यवस्था ,पुरुषप्रधान व्यवस्था, आजच्या कालावधीतील तंत्रज्ञान, जगातील कुटुंब व्यवस्था असा व्यापक प्रवास त्यांनी भाषणात मांडलि.

  डॉ.सुनीलकुमार लवटे म्हणाले, साहित्याच्या पूर्वकाळातील व उत्तरकाळातील कुटुंब व्यवस्थेच्या क्षेत्रात कमालीचे तफावत दिसून येते .सध्याच्या संघर्ष जीवनाचे वास्तव चित्रण साहित्य देणे गरजेचे आहे. 

प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण यांनी कुटुंब व्यवस्थेचा धांडोळा साहित्य, समाज व संस्कृतीच्या माध्यमातून व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

   मुंबई विद्यापीठातील इंग्रजी विषयाचे प्रोफेसर डॉ. शिवाजी सरगर व गोवा येथील आर एस एन कॉलेजमधील इंग्रजी विभागातील प्राध्यापिका डॉ. समिता अजगांकर - नायक यांनी साहित्य , समाजातील कुटुंब व्यवस्था यावर भाष्य केले. 

  या चर्चासत्राचे समन्वयक डॉ. एन. एस. जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ.शोभा चाळके यांनी पाहुणे यांचा परिचय करून दिला. प्रा. स्नेहल भोसले यांनी आभार मानले . डॉ.दया पाटील, प्रा. नीता संकपाळ, प्रा. तेजस्विनी पाटील, प्रा सुमय्या काजी यांनी संयोजन केले. 

प्राचार्य उत्तम पाटील,प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले,आय क्यू एसी समन्वय डॉ. आर.डी.मांडणीकर, सह समन्वयक डॉ.ए.बी.बलुगडे,परीक्षा विभाग प्रमुख डॉ. के. एम . देसाई, स्टाफ सेक्रेटरी डॉ. डि.के वळवी सर्व प्राध्यापक प्रशासकीय सहकारी संशोधक यावेळी उपस्थित होते.


शहाजी महाविद्यालयात साहित्य, संस्कृती आणि समाज यामधील कुटुंब व्यवस्था यावर राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न 
Total Views: 12