बातम्या
शेळके यांना शिवमल्हार राष्ट्रीय प्रेरणा आदर्श शिक्षक पुरस्कार
By nisha patil - 8/16/2026 11:31:30 PM
Share This News:
शेळके यांना शिवमल्हार राष्ट्रीय प्रेरणा आदर्श शिक्षक पुरस्कार
कागल प्रतिनिधी : अजित बोडके शेंडूर (ता. कागल) गावासाठी अभिमानास्पद बातमी आहे. आपल्या गावचे सुपुत्र आणि विद्यामंदिर रामकृष्णनगर, करनूर शाळेचे पदवीधर अध्यापक श्री. अवघडी सूर्याप्पा शेळके यांना त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील आदर्श आणि प्रेरणादायी कार्याची दखल घेत 'यशवंत ब्रिगेड, महाराष्ट्र राज्य' या संघटनेच्या वतीने शिवमल्हार राष्ट्रीय प्रेरणा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
श्री. शेळके सरांनी अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य, शिस्तप्रिय आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांनी निर्माण केलेली ओळख यामुळेच त्यांची या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या पुरस्कारामुळे शेंडूर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, करनूर पंचक्रोशीतून तसेच शिक्षण क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल शेंडूर ग्रामस्थ, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
शेळके यांना शिवमल्हार राष्ट्रीय प्रेरणा आदर्श शिक्षक पुरस्कार
|