बातम्या
शासनाच्या योजनांचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा - प्रभारी तहसीलदार सौ.क्रांती पाटील
By nisha patil - 10/4/2026 6:25:26 PM
Share This News:
शासनाच्या योजनांचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा - प्रभारी तहसीलदार सौ.क्रांती पाटील
शिरढोण प्रतिनिधी /(संजय गायकवाड )ता.१० सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या महसुली विषयी अडचणी तत्परतेने सोडवण्यासाठी तसेच प्रशासन लोकाभिमुख, पारदर्शक, गतिमान आणि कार्यक्षम बनवण्यासाठी सातबारा दुरुस्ती, फेरफार नोंदी, मालमत्ता पत्रक, वारस हक्क नोंद, जातीची दाखले, उत्पन्नाचे दाखले, पाणंद रस्ते अशा विविध महसूल विषयक प्रश्नांचा निपटारा करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून याचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे प्रतिपादन शिरोळच्या प्रभारी तहसीलदार सौ क्रांती पाटील यांनी केले.
शिरढोण मंडल अधिकारी कार्यालय अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान शिरढोण ( ता शिरोळ) येथे आयोजित करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पंचायत समिती सभापती मिलिंद कुरणे, उपसभापती सौ.मनीषा कदम, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सौ, श्रद्धा गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य सौ.अर्चना चौगुले, पंचायत समिती सदस्य प्रतिक उर्फ बंटी पाटील, सरपंच सागर भंडारे, नायब तहसीलदार विलास भिसे, विनय कौलवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिरढोण मंडल अधिकारी कार्यालयांतर्गत शिरढोण, टाकवडे, यड्राव, अब्दुल लाट, लाटवाडी, शिवनाकवाडी, शिरदवाड या गावातील नागरिकांना शासनाच्या वतीने देण्यात येणारे वेगवेगळ्या दाखले, सातबारा तसेच कृषी विभागाच्या वतीने रोटावेटर, ट्रॅक्टर आदीचे वाटप करण्यात आले. यावेळी महसूल विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, मुद्रांक व नोंदणी विभाग, भूमि अभिलेख, जिल्हा मध्यवर्ती बँक, महिला व बालकल्याण या विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी शासनाच्या योजनांची माहिती देऊन नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला.
यावेळी मंडल अधिकारी मच्छिंद्र कुंभार, ग्राम महसूल अधिकारी सौ माया माळी, कृषी सहाय्यक वृषाली तेरदाळे, ग्रामपंचायत अधिकारी विराज जत्थे, अमोल चौगुले, अविनाश गायकवाड, डॉ. मिलिंद कोलप, शक्ती पाटील, भास्कर कुंभार, राजेखान नदाफ, सचिन मालगावे, वर्षा सुतार, रमेश दानोळे, रणजीत पुजारी, रुबाब नदाफ, अंगणवाडी सेविका आशा सेविका यांच्यासह शिरढोण मंडलाधिकारी कार्यांतर्गत येणाऱ्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासनाच्या योजनांचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा - प्रभारी तहसीलदार सौ.क्रांती पाटील
|