बातम्या

अपघातातील मृत्यू प्रकरणी जबाबदारांवर गुन्हा दाखल करण्याची शिवसेनेची मागणी  __ अजित मोडेकर कागल शहर प्रमुख 

Shiv Sena demands registration of a case against those responsible


By nisha patil - 7/18/2026 10:18:10 PM
Share This News:



अपघातातील मृत्यू प्रकरणी जबाबदारांवर गुन्हा दाखल करण्याची शिवसेनेची मागणी 
__ अजित मोडेकर कागल शहर प्रमुख 

 

कागल प्रतिनिधी अजित बोडके कागल : प्रतिनिधीकागल तालुक्यातील चेकपोस्ट नाका परिसरात झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर या प्रकरणातील दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
 

शिवसेना कागल शहरप्रमुख अजित मोडेकर यांच्या नेतृत्वाखाली कागल पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, १७ जुलै २०२६ रोजी चेकपोस्ट नाका येथे झालेल्या अपघातात करनजीवणे येथील अनिल पाटील (वय २८) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर अपघात ट्रक व कंटेनर गाडीच्या धडकेत झाल्याचे सांगण्यात आले आहे.
 

निवेदनात आरोप करण्यात आला आहे की, संबंधित ठिकाणी टोल नाका व्यवस्थापन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि रस्ते नियोजनातील त्रुटी यामुळेच वारंवार अपघात घडत असून, या अपघातालाही संबंधित यंत्रणांची निष्काळजीपणा कारणीभूत आहे. त्यामुळे केवळ वाहनचालकांवर कारवाई न करता, अपघातासाठी जबाबदार असलेल्या संबंधित विभागांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच मृताच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
 

शिवसेनेने इशारा दिला आहे की, या प्रकरणात तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्यामुळे या मागणीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
या निवेदनावर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या असून, शहरप्रमुख अजित मोडेकर, तालुकाप्रमुख गोरखन टिकले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट

 

“अपघात नव्हे, व्यवस्थेचा बळी”
चेकपोस्ट नाका परिसरात वारंवार होणारे अपघात आणि त्यात होणारी जीवितहानी यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अपघातांच्या मालिकेमुळे रस्ते सुरक्षा, वाहतूक नियोजन आणि संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

 

यावेळी वाहतूक सेने चे जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे कागल तालुकाप्रमुख जयसिंग टिकले वाहतूक सेना शहर प्रमुख म्हाळू करी कट्टे.शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अशोक पाटील वैभव आडके सावंता कांबळे अण्णासो आवळे नंदकुमार पोतदार वैभव मोडेकर गणेश लामतुरे नितीन डावरे दिपाली घोरपडे मल्हारी पाटील जयसिंग मोरे सतीश हिरुगडे इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


अपघातातील मृत्यू प्रकरणी जबाबदारांवर गुन्हा दाखल करण्याची शिवसेनेची मागणी  __ अजित मोडेकर कागल शहर प्रमुख 
Total Views: 9