बातम्या

कोल्हापूर शहरातील खराब झालेल्या रस्त्यांच्या खड्ड्यात शिवसेनेचे झाडे लावून अनोखे आंदोलन...

Shiv Sena stages a unique protest by planting trees


By nisha patil - 8/27/2026 4:27:04 PM
Share This News:



कोल्हापूर शहरातील खराब झालेल्या रस्त्यांच्या खड्ड्यात शिवसेनेचे झाडे लावून अनोखे आंदोलन...

 कागल प्रतिनिधी अजित बोडके कोल्हापूर शहरात गेल्या काही महिन्यात - वर्षभरात शेकडो कोटी निधी रस्त्यांसाठी आला, त्या संदर्भात स्थानिक नेत्यांनी बॅनरबाजी ही जोरदार केली, पण वास्तविक जर कोल्हापूर शहरात फेरफटका मारून बघितल, तर प्रत्येक चौका - चौकात रस्त्यांच्या अवस्था अतिशय खराब, भूकंप झालेसारखी झालेली आहे, आत्ताच्या सुरू असलेल्या पावसामुळे तर अलीकडे काही महिन्यापूर्वी केलेले रस्ते पूर्णपणे खराब होऊन निकृष्ट झाले आहेत. प्रत्येक चौका - चौकात मोठ -मोठे खड्डे पडले आहेत, या खड्ड्यांमुळे अपघात,तसेच मानवी शरीराला अपायकारक वेदना, आणि वाहनांचे देखील नुकसान होत चालले आहे, तरी देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे, एवढे कोटी रस्त्यावर खर्च केले असतील तर मग रस्ते खराब कसे झाले? ते कोणाच्या खिश्यात गेले?असा सवाल करत या खराब रस्त्यांच्या व पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात कोल्हापूर शिवसेना शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या रस्त्यांच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यांमध्ये झाडे लावून अनोखे आंदोलन करण्यात आले, यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधात, 
टक्केवारी व भ्रष्टाचारा विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, हे प्रशासन म्हणजे कुंभकर्णाचे प्रशासन आहे, झोपलेले प्रशासन आहे,लोकांचा जीव गेल्यावर हे जागे होणार का?

असा सवाल यावेळी शिवसैनिकांनी केला , हे अनोखे आंदोलन शिवसेना शहरप्रमुख मंजीत माने यांच्या नियोजनाखाली करण्यात आले. या या आंदोलनात हटके बॅनरबाजी देखील केली होती, हे आंदोलन कोल्हापूर शहरातील अंबाबाई मंदिर परिसरा जवळ बिनखांबी गणेश मंदिर ते मिरजकर तीकटि रोड या रोडच्या परिसरात खराब रस्त्याजवळ करण्यात आले,येणाऱ्या काही दिवसात जर कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था सुधारली नाही तर संबंधित  स्थानिक नेत्यांना आणि ठेकेदारांना शिवसैनिक रस्त्यावर फिरूकू देणार नाहीत असा इशारा सर्वांनी दिला.

यावेळी उपस्थित शिवसेना उपनेते संजय पवार शिवसेना जिल्हाप्रमुख विराज पाटील,आयोजक शिवसेना शहरप्रमुख मंजित माने,माहीला उपजिल्हा प्रमुख स्मिता सावंत, दीपाली शिंदे,शौनक भिडे,रणजित आयरेकर,समरजीत जगदाळे,ऋषिकेश जोशी, पपू कोंडेकर तृप्ती विभुते, रुपेश रोडे, किशोर दाभाडे, अरुण अबदागिरी, कनिष्क शिंदे, चिन्मय बोकील, अक्षय मोरे, चिन्मय बोकील,

 


कोल्हापूर शहरातील खराब झालेल्या रस्त्यांच्या खड्ड्यात शिवसेनेचे झाडे लावून अनोखे आंदोलन...
Total Views: 16