बातम्या

कोल्हापुरात एटीएस मशिनच्या सक्तीविरोधात शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा; प्रशासनाकडून मॅन्युअल पासिंग तात्काळ सुरू

Shiv Sena threatens protest in Kolhapur against the mandatory


By nisha patil - 11/8/2026 2:35:36 PM
Share This News:



कोल्हापुरात एटीएस मशिनच्या सक्तीविरोधात शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा; प्रशासनाकडून मॅन्युअल पासिंग तात्काळ सुरू

तारा न्युज प्रतिनिधी अजित बोडके. कोल्हापूर: एटीएस मशिनच्या सक्तीमुळे ट्रक पासिंग ठप्प झाल्याप्रकरणी शिवसेना वाहतूक सेनेने तीव्र संताप व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला होता.
कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अचानक मॅन्युअल पासिंग बंद करून पासिंग ट्रक एटीएस मशिनद्वारे करण्याचे आदेश दिल्याने, जिल्ह्यातील सर्व वाहन पासिंग ठप्प झाले होते.यामुळे वाहनधारकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.ही माहिती मिळताच शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना (महासंघ ) राज्याध्यक्ष मा.उदय दळवी साहेब सरचिटणीस सूर्यकांत तांडेल साहेब यांच्या आदेशानुसार जिल्हा समन्वय दिनेश परमार यांनी, प्रादेशिक परिवहन कार्यालयाने पासिंग तातडीने सुरू करावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा दिला होता. 

 

 आज प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तात्काळ मॅन्युअल पासिंग सुरू करण्यात आले.तसेच, एटीएस मशिनद्वारे कशा पद्धतीने पासिंग होणार याची पूर्ण माहिती घेऊन अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली.वाहनधारकांना ज्या काही समस्या व अटी लागू असतात, त्याची पूर्ण माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवावी, *अशी मागणी करण्यात आली.
पासिंग ट्रॅक एटीएस मशिन चालू होईपर्यंत मॅन्युअल पद्धतीने पासिंग सुरू राहणार असल्याची ग्वाही संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.आज त्या ठिकाणी ८० गाड्यांचे पासिंग करण्यात आले, ज्यामध्ये मोठे ट्रक्स आणि छोटे कमर्शियल व्हेईकल यांचा समावेश होता*

 

यावेळी शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघ जिल्हा समन्वय दिनेश परमार, उपजिल्हाध्यक्ष संदीप पाटील,तालुका अध्यक्ष दत्ताजी फराकटे, ता. अध्यक्ष अप्पासाहेब कांबळे भारत प्रक्षाले अरुण पाटील नजीर भाई वाटंगी, आदी उपस्थित होते.

 


कोल्हापुरात एटीएस मशिनच्या सक्तीविरोधात शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा; प्रशासनाकडून मॅन्युअल पासिंग तात्काळ सुरू
Total Views: 6