बातम्या

विवेकानंद  कॉलेजची श्‍लोका  शिंदे   जिल्हा क्रीडा पुरस्काराने सन्मानित

Shloka Shinde of Vivekananda College honored with District Sports Award


By nisha patil - 8/19/2026 6:09:56 PM
Share This News:



विवेकानंद  कॉलेजची श्‍लोका  शिंदे   जिल्हा क्रीडा पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर दि. 18 : येथील विवेकानंद कॉलेजची एम.बी.ए. भाग 1 मध्ये शिकणारी विद्यार्थिनी  कु.  श्‍लोका श्रीपती शिंदे  यांना फेन्सींग या क्रीडा प्रकारामध्ये विशेष प्राविण्य्‍ मिळविल्याबद्दल पालकमंत्री मा. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते दि. 15 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  सदर विद्यार्थिनीने  राज्य्‍ स्पर्धेत 25 वेळा, राष्ट्रीय स्पर्धेत 14 वेळा , आंतरविद्यापीठीय स्पर्धेत 4 वेळा, खेलो इंडिया स्पर्धेत 2 वेळा तिने सुयश संपादन केलेले आहे. 

 तिच्या क्रीडा क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरीमुळे  तिला विविध पुरस्कार प्राप्त्‍ झाले आहेत.  या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे ,  संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री कौस्तुभ गावडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद एस. हुजरे यांनी अभिनंदन केले आहे.  तसेच  सदर विद्यार्थिनी जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव,  प्रा. संतोष कुंडले, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर श्री सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.  तिच्या या यशाबद्दल तिचे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.


विवेकानंद  कॉलेजची श्‍लोका  शिंदे   जिल्हा क्रीडा पुरस्काराने सन्मानित
Total Views: 19