बातम्या

आजऱ्याचे कोल्हापूर रहिवासी सिकंदर पठाण यांचे दुःखद निधन**

Sikandar pathan


By nisha patil - 7/17/2026 11:05:19 PM
Share This News:



*आजऱ्याचे कोल्हापूर रहिवासी सिकंदर पठाण यांचे दुःखद निधन**

**आजरा(हसन तकीलदार)*:-खेडे (मुळगाव), ता. आजरा, जि. कोल्हापूर येथील रहिवासी. स्व. आप्पालाल पठाण यांचे चिरंजीव, नीता ट्रॅव्हल्सचे संचालक, तसेच वसंतराव देसाई आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. चे संचालक रशिद पठाण यांचे पुतणे, युवा उद्योजक सिकंदर आप्पालाल पठाण (वय वर्षे 56 )यांचे आज अपघाती दुःखद निधन झाले.

अधिक माहिती अशी की,

दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर येथे झालेल्या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मावळली.

पठाण कुटुंबिय पंचगंगा हॉटेल व नीता ट्रॅव्हल्स या व्यवसायांमुळे कोल्हापूर तसेच आजरा परिसरात सुपरिचित आहेत. आजरा येथेही त्यांचे वास्तव्य असून सण-उत्सव, सामाजिक व कौटुंबिक कार्यक्रमांमधून त्यांचा आजरा परिसराशी कायम जिव्हाळ्याचा संबंध होता.

सिकंदर पठाण हे मनमिळाऊ, हसतमुख, सुस्वभावी, नम्र आणि होतकरू युवा उद्योजक म्हणून सर्वांच्या परिचयाचे होते. त्यांच्या अकाली जाण्याने आजरा परिसरासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.चंदगडचे मदार कुटुंबीय तसेच आजऱ्याचे दीडबाग कुटुंबियांचे ते नातेवाईक होत.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, भाऊ, चुलते व अन्य आप्तस्वकीय असा मोठा परिवार आहे.

दफन विधी शनिवार दि.18 जुलै 2026 सकाळी 11:00 वाजता आजरा येथील कबरस्तान येथे होणार असलेचे सांगण्यात येत आहे.

पठाण कुटुंबावर ओढवलेल्या या अपरिमित दुःखामुळे आजरा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


आजऱ्याचे कोल्हापूर रहिवासी सिकंदर पठाण यांचे दुःखद निधन**
Total Views: 387