बातम्या

स्मार्ट मीटरची सक्ती नको,स्मार्ट मीटरला समांतर डिजिटल मीटर बसवून वीज बिल तपासणी

Smart miter 1


By nisha patil - 7/14/2026 8:49:08 PM
Share This News:



**स्मार्ट मीटरची सक्ती नको,स्मार्ट मीटरला समांतर डिजिटल मीटर बसवून वीज बिल तपासणी करा*

**बहुजन मुक्ती पार्टीची महावीतरणकडे मागणी*

**आजरा(हसन तकीलदार)*:-बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आजरा महावीतरणच्या उपकार्यकारी अभियंता यांच्यासोबत स्मार्ट मीटरच्या सक्ती विरोधात जाब विचारण्यासाठी चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अथवा कर्मचाऱ्यांनी स्मार्ट मिटरची सक्ती करु नये तसेच स्मार्ट मिटर बसवल्यापासून वीज बिले दुपटीने तीपटीने का येत आहेत?

स्मार्ट मीटरला समांतर डिजिटल मीटर बसवून स्मार्ट मिटरची खात्री करा अशा मागण्या करण्यात आल्या.उपकार्यकारी अभियंता अतुल पाटील यांनीही सकारात्मक चर्चा करीत तक्रारिंचे आणि शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करीत आपल्या मागण्यांचे व तक्रारीबाबतचे निवेदन द्या असे संगितले. तसेच याबाबत वरीष्ठाशी चर्चा करून आपल्या तक्रारिंचे निराकरण नक्कीच करु असे आश्वासन दिले.

    यावेळी बोलताना बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रभारी डॉ. उल्हास त्रिरत्ने म्हणाले की, स्मार्ट मिटर बसवल्यापासून ग्राहकांना वीज बिले दुपटी तीपटीने येत आहेत. मुख्यमंत्री म्हणतात की हिट वेव्ह आल्यामुळे बिले वाढली आहेत तर मग मागच्या काळात हिट वेव्ह नव्हती काय? मुंबईसह नागपूर खंडपिठात स्मार्ट मिटर बाबत केस प्रलंबित आहे. तरीसुद्धा महावीतरण बंधनकारक आहे असे सांगून सक्तीने स्मार्ट मिटर बसवत आहे. हे असंविधानिक आहे. लोकांची एक प्रकारे फसवणूक आहे. जी बिलं जादा येत आहेत त्याचे स्पष्टीकरण आणि उत्तरे महावितरणकडे नाहीत. पूर्वी जुने मीटर काढून डिजिटल मीटर बसवले गेले त्यावेळी नागपूर खंडपिठाने डिजिटल मीटर निर्दोष व योग्य आहेत असे नमूद केले होते मग 12 वर्षानंतर या डिजिटल मिटरांची विश्वासार्हता कमी झाली का? ज्यांचे जुने डिजिटल मिटर काढून स्मार्ट मिटर बसवले आहेत त्या ठिकाणी समांतर डिजिटल मीटर बसवून दोन्ही मीटरची तफावत तपासून पहा. ही तपासणी किमान सहा महिन्याची असावी जेणेकरून स्मार्ट मीटर प्रमाणित आहे की नाही याची ग्राहकाला खात्री होईल.

   डॉ. सुदाम हरेर( तालुका अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी )म्हणाले की, गरीब लोकांच्यावरील भुर्दंड कमी करा. जुने मिटर पुन्हा बसवा. ग्रामीण भागातील वीज खंडित करून भारनियमन केले जाते. सद्या हत्ती, गवे, बिबट्या सारखे वन्य प्राणी गावापर्यंत आले आहेत. अंधारात ग्रामीण लोकांनी अशा परिस्थितीत रहायचे आणि जगायचे कसे? वन्य प्राण्यापासून रक्षण कसे करायचे? अंधारात साप विंचुची भीती असते.ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न तुटपुंजे आहे. शेतात राबून आपली उपजिविका करतात. हे अवाजवी येणारे वीज बिलं भरायचे कसे असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर आहे त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे वीजबिल माफ केले पाहिजे.

 राहुल मोरे म्हणाले की,खेडेगावातून आठ पंधरा दिवस बत्ती गुल असते. महावीतरणच्या नियमानुसार 24 तास वीजपुरवठा बंद पडल्यास प्रती तासाप्रमाणे नुकसान भरपाई ग्राहकांना देणे बंधनकारक आहे मग आठ आठ दिवस बत्ती गुल असेल तर याची नुकसान भरपाई कोण देणार?आम्हाला तुमच्या स्मार्ट मीटर मधील सुविधा नको. जुने मीटर बसावा आणि आमची वीज बिले पूर्ववत कमी करा.

   यावेळी दशरथ सोनुले, शरद पाटील, नितीन राऊत, अमित सुळेकर, सलीम महागोंडे, जुल्फीकार शेख, समीर तकीलदार, संदीप दाभीलकर, पार्थ कांबळे, सलाउद्दीन खेडेकर, युवराज देशमुख, मजीद मुल्ला, निसार मुल्ला, प्रकाश हसबे,अब्दुल लाडजी, रहीमबक्ष नेसरीकर, साजिद दरवाजकर यांच्यासह बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.


स्मार्ट मीटरची सक्ती नको,स्मार्ट मीटरला समांतर डिजिटल मीटर बसवून वीज बिल तपासणी
Total Views: 312