बातम्या
साखरेचा काळाबाजार थांबवा, अन्यथा रस्त्यावर उतरू; शेट्टी-जानकरांचा इशारा!
By nisha patil - 1/9/2026 4:16:23 PM
Share This News:
साखरेचा काळाबाजार थांबवा, अन्यथा रस्त्यावर उतरू; शेट्टी-जानकरांचा इशारा!
नवी दिल्ली : साखरेच्या दरात झालेल्या अचानक वाढीमुळे सामान्य ग्राहकांची लूट होत असताना वाढीव दराचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मात्र मिळालेला नसल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
दोन्ही नेत्यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव अश्विन श्रीवास्तव यांची भेट घेऊन साखर कारखानदार आणि व्यापाऱ्यांच्या संगनमतामुळे कृत्रिम टंचाई व साठेबाजी होत असल्याचा आरोप केला.
सरकारकडे साखर साठ्याची चुकीची आकडेवारी दिली जात असल्याने संशयित कारखान्यांच्या गोदामांवर विशेष पथकाद्वारे धाडी टाकून प्रत्यक्ष साठा तपासण्याची मागणी करण्यात आली.
देशात पुरेसा साखर साठा आणि आगामी हंगामात बंपर उत्पादनाची शक्यता असताना साखर आयात करू नये, अशीही मागणी करण्यात आली. साठेबाजांवर तातडीने कारवाई न झाल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांनी दिला.
साखरेचा काळाबाजार थांबवा, अन्यथा रस्त्यावर उतरू; शेट्टी-जानकरांचा इशारा!
|