बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये “विद्यार्थी करिअर मार्गदर्शन” व्याख्यान संपन्न
By nisha patil - 7/28/2026 3:08:29 PM
Share This News:
“ कंपनी सेक्रेटरी क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी ” सौ. कपिला टिक्के, कंपनी सेक्रेटरी
विवेकानंद कॉलेजमध्ये “विद्यार्थी करिअर मार्गदर्शन” व्याख्यान संपन्न
कोल्हापूर दि. 28 : विद्यार्थ्यांनी आपली योग्यता आणि आवड जाणून भविष्यातील करिअर निवडावे आजच्या युगात वाणिज्य शाखेला अनन्यसाधारण महत्त्व आले असून कंपनी सेक्रेटरी करिअरमध्ये नानाविध संधी प्राप्त झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना उज्वल करिअरसाठी सी.एस. हा उत्तम पर्याय आहे विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडवावे. असे मत सुप्रसिद्ध कंपनी सेक्रेटरी सौ. कपिला टिक्के यांनी व्यक्त केले. येथील विवेकानंद ज्युनिअर कॉलेजच्या वाणिज्य विभागाच्या वतीने आयोजित विद्यार्थी करिअर मार्गदर्शन व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
त्या पुढे म्हणाल्या, कंपनीला प्रोत्साहन देणे, सेक्रेटरी रेकॉर्ड ठेवणे, नियमांचे पालन करणे आणि कंपनीचा सर्वांगीण विकास करणे. हे उत्तम कंपनी सेक्रेटरीचे वैशिष्ट्य आहे.
स्वागत व प्रास्ताविक प्रा.सौ. शिल्पा भोसले यांनी केले. याप्रसंगी त्या म्हणाल्या कंपनी सेक्रेटरी हे एक रोजगाराचे उत्तम क्षेत्र आहे . विवेकानंद ज्युनियर कॉलेज शाखेतील गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेतून सी.ए. आणि सी.एस.परीक्षेत उज्वल यश संपादन करण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
संस्था प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रा.सौ. शुभांगी पाटील आणि प्रा.सौ.अश्विनी गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सौ. वर्षा महाडिक यांनी आभार मानले. ग्रंथालय हॉल येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक, विद्यार्थी , पालक यांची उपस्थिती मोठया संख्येने होती.
विवेकानंद कॉलेजमध्ये “विद्यार्थी करिअर मार्गदर्शन” व्याख्यान संपन्न
|