बातम्या

सुधीरभाऊंचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा

Sudhirbhau birthday celebration


By nisha patil - 10/7/2026 11:32:16 PM
Share This News:



**नेतृत्व असं असावं जे केवळ सत्तेच्या चौकटीत न रमता समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत मायेचा हात पोहोचवेल-वृषाल हुक्केरी**

*सुधीरभाऊंचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा*

**आजरा(हसन तकीलदार)*:-जिल्हा बँकेचे धडाडीचे संचालक आणि जिल्हा परिषदेचे लोकप्रिय गटनेते सुधीरभाऊ देसाई यांच्या रूपाने तालुक्याला असाच एक संवेदनशील आणि दूरदृष्टी असलेला नेता लाभला आहे. नुकताच भाऊंचा वाढदिवस पार पडला. मात्र, राजकीय गदारोळ, हार-तुरे आणि मोठमोठे होर्डिंग्ज या पलीकडे जाऊन या वाढदिवसाला एका सुंदर सामाजिक कृतज्ञतेची जोड देण्यात आली.अशी माहिती सुधीरभाऊंचे खंदे समर्थक व सामाजिक कार्यकर्ते वृषाल अण्णा हुक्केरी यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की,

यंदाच्या वाढदिवसाला सुधीरभाऊ प्रत्यक्ष उपस्थित नसले, तरी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या कार्यकर्त्यांनी आणि सहकाऱ्यांनी अत्यंत आदराने व उत्साहाने हा दिवस साजरा केला. कोणताही बडेजाव किंवा अनावश्यक दिखावा न करता, भाऊंच्या अनुपस्थितीत त्यांच्याच सामाजिक संकल्पनेला मूर्त रूप देण्यात आले. या निमित्ताने तालुक्यातील प्राथमिक शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील सर्वसामान्य, शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबातील मुलांचा शैक्षणिक पाया भक्कम व्हावा, हाच या उपक्रमामागचा मुख्य आणि प्रामाणिक उद्देश होता.

शाळा-शाळांमध्ये जाऊन जेव्हा हे साहित्य वितरित करण्यात आले, तेव्हा नवी कोरी पुस्तके, वह्या आणि शैक्षणिक साधने हातात पडताच या चिमुरड्यांच्या चेहऱ्यावर फुललेले निखळ हास्य शब्दातीत होते. विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील ती चमक हीच सुधीरभाऊंसाठी वाढदिवसाची खरी आणि सर्वात मौल्यवान भेट ठरली.

या महत्त्वपूर्ण उपक्रमाप्रसंगी शुभम पाटील, अमित गुरव, शंकर सुतार, सुयश पाटील, मनोज गुरव, हरीषचंद्र पाटील आणि शिवराज सुतार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी स्वतः उपस्थित राहून शाळांमध्ये जाऊन शिस्तबद्ध पद्धतीने या साहित्याचे वाटप केले.


सुधीरभाऊंचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा
Total Views: 134