बातम्या

ठिबक सिंचनसारख्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास एकरी 100 टन ऊस उत्पादन शक्य - सुरेश कबाडे

Sugarcane yield of 100 tonnes per acre is possible


By nisha patil - 10/8/2026 12:53:08 PM
Share This News:



ठिबक सिंचनसारख्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास एकरी 100 टन ऊस उत्पादन शक्य - सुरेश कबाडे


ऊस पिकासाठी पोषकता वाढवणाऱ्या इतर पिकांचा वापर करून ठिबक सिंचनसारख्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास एकरी 100 टन ऊस उत्पादन हमखास घेता येते.असा विश्वास महाराष्ट्रातील  प्रगतशील शेतकरी सुरेश कबाडे कारंदवाडी (ता - वाळवा ) यांनी व्यक्त केला.
           

लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त ऊसशेती तंत्रज्ञान अभियाना तंर्गत शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी चेअरमन संजय मंडलिक होते. यावेळी ध्वजारोहण चेअरमन संजय मंडलिक यांच्या हस्ते झाले .लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रतिमेचे पूजन चेअरमन संजय मंडलिक , सुरेश कबाडे, विश्वास कुराडे व मान्यवरांच्या हस्ते झाले .
           

 यावेळी सुरेश कबाडे म्हणाले,माती परीक्षण , पूर्व मशागत, हिरवळीच्या पीक खतांचा वापर, सरीतील अंतर, खतांचे डोस , औषध फवारण्या , सुक्ष्म अन्नद्रव्य, बियाणे, खोड किडीचे नियंत्रण या घटकावर योग्य पद्धतीने लक्ष दिल्यास निश्चितच एकरी १०० टन ऊस उत्पादन शक्य आहे.
           

यावेळी संजय मंडलिक म्हणाले, उपलब्ध क्षेत्रातून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. जास्तीत जास्त शेती ठिबक सिंचनाखाली आणली पाहिजे. त्या बरोबरच एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे . पुढील हंगामा पासून कारखाना ऊस पीक स्पर्धा पूर्ववत सुरू करणार आहे .
यावेळी व्हॉईस चेअरमन विश्वास कुराडे, संचालक विरेंद्र मंडलिक, शिवाजीराव इंगळे, प्रकाश पाटील, आनंदराव फराकटे, तुकाराम ढोले, एन एस चौगले , प्रधान भोजे, प्रा.संभाजी मोरे ,कृष्णा शिंदे , धनाजी बाचणकर  , महेश घाटगे , मंगल  तुकान ,पुंडलिक पाटील , प्रदिप चव्हाण , विष्णु बुबा,  नेताजी बळवंत पाटील ,सौ. नंदिनीदेवी नंदकुमार घोरपडे  , सौ.प्रतिभा भगवान पाटील , अनिल कांबळे ( सिद्धेश्वर ) , सचिन ढवण.सर्जेराव पाटील यांच्यासह नारायण मुसळे , शिवानंद माळी , सुनील रणवरे , बाजीराव गोधडे, प्र.सेक्रेटरी सुदाम देसाई उपस्थित होते .स्वागत भगवान पाटील यांनी प्रास्ताविक एन एस चौगले यांनी तर पाहुण्यांची ओळख कोजिमाशी संचालक अविनाश चौगले यांनी करून दिली .


 कागल प्रतिनिधी अजित बोडके


ठिबक सिंचनसारख्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास एकरी 100 टन ऊस उत्पादन शक्य - सुरेश कबाडे
Total Views: 6