बातम्या

सुलगाव ता. आजरा येथे जैविक पद्धतीने कीड नियंत्रण या विषयावर मार्गदर्शन शिबीर संपन्न*

Sulgav


By nisha patil - 7/30/2026 7:38:36 PM
Share This News:



**सुलगाव ता. आजरा येथे जैविक पद्धतीने कीड नियंत्रण या विषयावर मार्गदर्शन शिबीर संपन्न*

**आजरा(हसन तकीलदार)*:-मंगळवार दिनांक 28 /07/2026 रोजी भावेश्वरी शेतकरी गट,सुलगाव येथे पाणी फाउंडेशन फार्मर कप स्पर्धेच्या अनुषंगाने चर्चासत्र स्वरूपात सभा घेण्यात आली. यावेळी फिल्ड ऑफिसर विश्वास पवार (गोदरेज ऍग्रोव्हेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी गडहिंग्लज)

 यांनी जैविक पद्धतीने किड नियंत्रण या विषयावर गटातील सर्व शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर गटामार्फत रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड कार्यक्रम घेण्यात आला. शेतकऱ्यांना चिकट सापळे, कामगंध सापळे पक्षी थांबे शेतामध्ये लावण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

        पाणी फाउंडेशन यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या फार्मर् कप स्पर्धेमध्ये भावेश्वरी शेतकरी गट सुलगाव यांनी सहभाग घेतला असल्याने स्मार्ट शेती ॲप संदर्भात मार्गदर्शन केले.गटाची गुणवत्ता आणि मार्क मिळवण्यासाठी सर्वे(स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर )केलेल्या आहेत पण त्या ॲपमध्ये भरणं खूप गरजेचे असल्याचे सहाय्यक कृषी अधिकारी सौ. मनिषा धनाजी पाटील यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.गटाने आतापर्यंत गिरीपुष्पाच्या पाल्याचा वापर, गादीवाफ्यावर रोप तयार करणे, नियंत्रित पद्धतीने रोप लागण करणे,त्याचबरोबर एकत्र बियाणे खरेदी करणे,एकत्र खत खरेदी करणे अशा सर्व (एस. ओ. पी )गटामार्फत राबविले आहे.त्याचबरोबर जैविक पद्धतीने किड नियंत्रण होण्यासाठी चिकट सापळे , कामगंध सापळे एकत्रित खरेदी करून गटातील सर्व सदस्यांच्या शेतामध्ये लावण्याचे काम चालू असल्याचे सांगितले तसेच सामाजिक कार्यामध्ये वृक्षारोपण करणे, शाळेतील बागेमध्ये परस बाग तयार करणे हे काम देखील गटामार्फत सुरू असल्याचे मेंटर पाणी फाउंडेशन तथा सहाय्यक कृषी अधिकारी सौ.मनिषा पाटील यांनी सांगितले.त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्या सौ.नंदिनी अंबाजी डोंगरे यांनी गटाचे कामकाज करत असताना खूप छान पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन आणि सहकार्य सौ. मनिषा पाटील (मेंटर सहाय्यक कृषी अधिकारी) यांचे मिळत असल्याचे सांगितले.तसेच गटातील सदस्यांचे देखील पाणी फाउंडेशन फार्मर कप स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. गटामार्फत एकत्र बियाणे, खते, चिकट सापळे, कीटकनाशके खरेदीमुळे गटातील शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होत असल्याचा आणि गटातील सर्व सदस्य एकत्र शेतीतील काम करत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये वेगळाच उत्साह निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले. सदर कार्यक्रमास सौ. विजया वरदेकर माजी ग्रामपंचायत सदस्या, विश्वास देसाई (तंटामुक्त कमिटीचे सदस्य )आणि भावेश्वरी शेतकरी गट सुलगावचे सर्व सदस्य आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे आभार गटातील निमंत्रक ओंकार खवरे यांनी केले.


सुलगाव ता. आजरा येथे जैविक पद्धतीने कीड नियंत्रण या विषयावर मार्गदर्शन शिबीर संपन्न*
Total Views: 97