बातम्या

महिलांच्या स्वावलंबनासाठी स्वराज्य कल्याण संस्थेचा पुढाकार

Swarajya kalyan


By nisha patil - 7/26/2026 11:21:15 PM
Share This News:



महिलांच्या स्वावलंबनासाठी स्वराज्य कल्याण संस्थेचा पुढाकार

१,००० मोफत शिलाई मशीनचे होणार वाटप

कोल्हापूर, दि. २६ : ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून स्वयंरोजगाराच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्थेच्या वतीने लवकरच १,००० मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे अनेक महिलांना स्वतःचा रोजगार सुरू करण्याची संधी मिळून त्या स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे.

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून ग्रामीण भागातील महिलांच्या कौशल्याला चालना मिळणार असून, त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीलाही हातभार लागणार आहे. "स्वावलंबी महिला – सक्षम कुटुंब – समृद्ध गाव" हा संदेश देत अधिकाधिक पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा सौ. निवेदिता युवराज येडूरे यांनी केले आहे. संस्थेतर्फे महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


महिलांच्या स्वावलंबनासाठी स्वराज्य कल्याण संस्थेचा पुढाकार
Total Views: 10