बातम्या

*सरनोबतवाडी येथे सुरू असलेले अवैध दारू विक्री करणाऱ्या वर तात्काळ कारवाई करा

Take immediate action against


By nisha patil - 1/9/2026 4:09:10 PM
Share This News:



*सरनोबतवाडी येथे सुरू असलेले अवैध दारू विक्री करणाऱ्या वर तात्काळ कारवाई करा

*आजरा(हसन तकीलदार):- करवीर तालुका सरनोबतवाडी येथे दत्त गल्ली येथे दारू अड्डा चालविणारे गोविंद बाळू अभंगे व पत्नी शशिकला यांचा या गावात दारु विक्री मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडत आहे घरगुती हिंसा,गुन्हेगारी,युवक व्यसनाधीन होणे व नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत आहेत.नागरिकांची कुटुंबे व्यसनाधीन होऊन उध्वस्त होत आहेत.

यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कोल्हापूर, पोलीस निरीक्षक  राज्य उत्पादन शुल्क अधिकारी कोल्हापूर, ग्रामपंचायत सरनोबतवाडी गांधीनगर,पोलीस स्टेशन यांना अवैध दारू विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी निवेदन रिपब्लिकन सेनेतर्फे लेखी स्वरूपात देण्यात आली होती. त्यावर आजअखेर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसलेन पुन्हा निवेदन देण्यात आले आहे.
          निवेदनात म्हटले आहे की याअगोदर निवेदने दिली आहेत त्याची पोहोच निवेदनासोबत जोडलेले आहे 7  दिवसात या गावातील दारू अड्डा कायमस्वरूपी बंद झाला नाही तर रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात आंदोलन करण्यात येईल.

यावेळी  सागर कुरडे (जिल्हा महासचिव), अमोल कांबळे (जिल्हा युवा अध्यक्ष), भिमराव गोंधळी (करवीर तालुका अध्यक्ष), अर्जुन कांबळे( करवीर महासचिव), प्रवीण आजरेकर (कोल्हापूर शहर अध्यक्ष),अर्जुन गोंधळी (करवीर महासचिव),रसिका चौगुले (महिला आघाडी), साहिल कांबळे, सुशांत कांबळे, विनोद कांबळे, रवी कांबळे (युवा उपाध्यक्ष)आदिजण उपस्थित होते.


*सरनोबतवाडी येथे सुरू असलेले अवैध दारू विक्री करणाऱ्या वर तात्काळ कारवाई करा
Total Views: 40