बातम्या
व्यंकटराव हायस्कूल मध्ये शिक्षक दिन साजरा
By nisha patil - 5/9/2026 11:28:27 PM
Share This News:
व्यंकटराव हायस्कूल मध्ये शिक्षक दिन साजरा
*आजरा(हसन तकीलदार):-थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन, आजरा तालुक्याचे सुपुत्र ज्येष्ठ शिक्षणतज्ञ जे.पी.नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून व्यंकटराव शिक्षण संकुलामध्ये शिक्षक दिन संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांचे शुभ हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
यावेळी प्राचार्य संजयकुमार पाटील , पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार , प्राथमिक मुख्याध्यापक आर.व्ही.देसाई, एम.ए.पाटील यांच्याबरोबरच सर्व स्टाफ उपस्थित होता.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक वृंदांना भेट देऊन आदर व्यक्त केला. त्याचबरोबर मुस्तफिज अमित खेडेकर या विद्यार्थ्याने सर्व शिक्षकांना लोकरी पासून आई व स्वतः तयार केलेले गुलाबाचे फुल सप्रेम भेट देऊन गुरुप्रती आदर व्यक्त केला.ज्ञानदानाचे पवित्र कार्य हे भाग्यानेच मिळते. ज्ञानदान ही सेवा म्हणून आपल्या संकुलातील सर्व शिक्षक अतिशय मनोभावे सत्कार्य करत आहेत. या कार्याकडे पाहून या संकुलाचा समाजामध्ये अभिमान वाढत आहे याचे आम्हाला कौतुक वाटते असे मत व्यक्त करून संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. शिक्षक आणि त्यांचे कार्य प्रत्यक्ष कृतीतून अनुभवता यावे म्हणून शाळेतील जवळपास 80 पर्यंत विद्यार्थ्यांनी एक दिवस शिक्षक होण्याचा अनुभव घेतला. अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षक व त्यांचे अध्यापनाचे कार्य सुरळीत पार पाडले. विद्यार्थी मुख्याध्यापक म्हणून क्षितिज थोरवत याने आपले काम विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मदतीने पूर्ण केले. विद्यार्थ्यांना आपल्या मधीलच विद्यार्थी बंधू भगिनी आज वर्गामध्ये शिक्षक होऊन शिक्षकाच्या गणवेशामध्ये अध्यापन करताना अनुभवले.आपल्या अध्यापनाचे नियोजन व वेळापत्रक कार्यक्रम विभाग प्रमुख पी.व्ही.पाटील, सौ.ए.एस.गुरव एस.एस.गिलबिले, एस.बी.पाटील , डी.आर.पाटील यांनी केले. शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा विद्यार्थ्यांनी यथोचित सन्मान केला. प्राचार्य संजयकुमार पाटील यांनी कार्यक्रमाचा आढावा घेऊन शुभेच्छा दिल्या.
व्यंकटराव हायस्कूल मध्ये शिक्षक दिन साजरा
|