बातम्या

स्व. बंडा आप्पा माने पतसंस्थेची २५वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न...... ........ 

The 25th Annual General Meeting of the Late Banda Appa


By nisha patil - 7/9/2026 5:41:29 PM
Share This News:



स्व. बंडा आप्पा माने पतसंस्थेची २५वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न...... ........ 
 

११ टक्के लाभांशाची शिफारस..... ...................... 
 

दत्तवाड : प्रातिनिधि आचिन  हेरवाडे....  स्व. बंडा आप्पा माने ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., दत्तवाडची २५वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी राजगोंडा झुणके यांची निवड करण्यात आली होती. 
 

कार्यक्रमाची सुरुवात श्री. जितेंद्र काटकर यांनी  स्वागता व प्रास्ताविक केले. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी दिवंगत कै बंडा आपपा माने    यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. सभेचे अध्यक्ष निवडण्यासाठी सूचक म्हणून श्री. शिवाजी  जाधव, तर अनुमोदक म्हणून श्री.बाबुराव दत्तात्रय पोवार यांनी भूमिका बजावली. संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन श्री. रमेश शिरगांवे  यांनी केले.
 

सभेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. एस.एस.सी. परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या कु. आनिष महेश शिरगांवे, कु. विश्वजित प्रकाश पाटील  , कु. श्रुतिका सुरेश अथणे कु. समेद  प्रमोद शिरगांव  यांचा तसेच एल.एल.बी. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कु. प्रफुल्ल चंद्रकांत यादव यांचा सत्कार करण्यात आला.
 

यानंतर संस्थेच्या कामकाजाचा व आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यात आला. आर्थिक अहवालानुसार २०२५-२६ मध्ये संस्थेचे कर्ज वाटप सुमारे ₹४ कोटी ६० लाखांवर पोहोचले असून,  संस्थेच्या ठेवी सुमारे ₹६ कोटी ४८ लाख, गुंतवणूक सुमारे ₹३ कोटी २८ लाख, तर तसेच भागभांडवल सुमारे ₹४९ लाख असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. संस्थेचा निव्वळ नफा सुमारे ₹८.९० लाख असून, ११ टक्के लाभांशाची शिफारस करण्यात आली आहे. संस्थेचा ऑडिट वर्ग सलग ‘अ’ असल्याचेही अहवालात वाचनात करण्यात आले.
 

, कर्जवसुली व संस्थेच्या आर्थिक व्यवहाराबाबत सभासदांनी चर्चा केली.यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. सुरेश गुंडू पाटील यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. उदय पाटील (राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा सरचिटणीस), रामचंद्र मोटे (दत्त सोसायटी चेअरमन), प्रकाश पाटील सर, बसगोंडा पाटील सुळकुडे आणि मधुकर चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या प्रगतीसाठी सभासद, संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याबद्दल यावेळी गौरवोद्गार काढण्यात आले.
 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पाच्छापुरे सर यांनी केले. श्री. शिवाजी जाधव यांनी आभार मानले. सभेस संस्थेचे संचालक, सभासद, कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


स्व. बंडा आप्पा माने पतसंस्थेची २५वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न...... ........ 
Total Views: 89