बातम्या
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
By nisha patil - 3/9/2026 5:12:20 PM
Share This News:
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
सभासदांना 11 टक्के लाभांशाची घोषणा
कोल्हापूर : दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतसंस्थेची 43 वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली . पतसंस्थेच्या सभासदांना 11 टक्के लाभांश देण्याची घोषणा पतसंस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल आंबले यांनी यावेळी केली. या सभेत सेवानिवृत्त सभासद, सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा, गौरव प्राप्त सभासदांचा यावेळी सत्कार करण्यात आला .
कोल्हापूर महानगरपालिकेचे नगरसेवक श्री इंद्रजीत बोंद्रे, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, पतसंस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल आंबले, संस्थेचे अधीक्षक व पतसंस्थेचे संचालक श्री मनीष भोसले यांच्या हस्ते हे सत्कार संपन्न झाले.
सभासदांचे गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी श्रावणी कांबळे, सई पाटील, अनुराग भोसले,यश कांबळे, प्रांजल मांडणीकर , विशेष शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त सभासद श्री रंगराव कांबळे, सरदार पाटील यांचाही मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार झाला.
संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग दादा बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रोत्साहनाने संस्था प्रगतीपथावर असून 19 लाख रुपयाहून अधिक नफा झाल्याचे पतसंस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल आंबले यांनी सांगितले. सेक्रेटरी पांडुरंग भंडारी यांनी सभेपुढील विषयाचे वाचन केले. सभासदांनी सर्व विषयांना मंजुरी दिली.
यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील, संचालक मनीष भोसले, डॉ.दीपक कुमार वळवी,डॉ.अनिल बलगुडे,अजित पाटील ,पंढरीनाथ पाटील, डॉ.पांडुरंग पाटील, शिवाजी पाटील, , अशोक हराळे,रंगराव कांबळे मनीषा पाटील, डॉ.सौ.नीता काशिद पाटील उपस्थित होते.
प्रसाद धावरे यांनी संयोजन केले. डॉ. पांडुरंग पाटील यांनी आभार मानले. सभासद मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
|