बातम्या

 कोल्हापुरातील शाहू छत्रपती मिल पुन्हा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करावा, शाहू मिलच्या माजी कामगार संघटनेची भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्याकडे मागणी

The Shahu Mill former workers union has urged Krishnaraj Mahadik

By nisha patil - 11/8/2026 11:22:09 PM
Share This News:

 कोल्हापुरातील शाहू छत्रपती मिल पुन्हा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करावा, शाहू मिलच्या माजी कामगार संघटनेची भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्याकडे मागणी

कोल्हापूरातील शाहू मिलच्या माजी कामगार संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची भेट घेवून निवेदन दिले. आणि बंद पडलेली शाहू छत्रपती मिल पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. कोल्हापुरातील गोरगरीब, दलित आणि बहुजनांच्या हाताला रोजगार मिळावा म्हणून राजर्षि शाहू महाराजांनी स्वखर्चाने ही मिल सुरू केली. 

मात्र त्यांच्या पश्‍चात ती मिल खाजगी कंपनीकडे चालवायला दिली. आणि त्यानंतर ती मिल वस्त्रोद्योग महामंडळाकडे गेली. मिल बंद होईपर्यंत त्यामध्ये सुमारे ३ हजार ५०० कामगार काम करत होते. त्यांच्या कुटूंबांचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून होता. मात्र शासनाने ही मिल बंद केल्याने शेकडो कुटूंबांवर बेरोजगारी आणि उपासमारीची कुर्‍हाड कोसळली आहे. त्यामुळे राजर्षि शाहू महाराजांचे जीवंत स्मारक म्हणून ही मिल पुन्हा सुरू करावी आणि माजी कामगारांच्या वारसासह कोल्हापूरातील गोरगरीब, गरजू आणि शिक्षित तरूणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी माजी कामगार संघटनेची मागणी असल्याचे संघटनेचे अध्यक्ष शेखर कवाळे यांनी कृष्णराज महाडिक यांच्या निदर्शनाला आणून दिले. कृष्णराज महाडिक यांनी, राज्य शासनाकडे पाठपुरावा करून, ही मिल पुन्हा सुरू करावी आणि गोरगरीब, बेरोजगार तरूणांच्या हाताला काम उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यावर पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन कृष्णराज महाडिक यांनी दिले. महाडिक यांना भेटलेल्या शिष्टमंडळात अनिल कवाळे, रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे, शिवम बुचडे, गणेश बुचडे, राहूल कवाळे, बाळासाहेब कवाळे,

 कोल्हापुरातील शाहू छत्रपती मिल पुन्हा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करावा, शाहू मिलच्या माजी कामगार संघटनेची भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्याकडे मागणी
Total Views: 13