बातम्या
विवेकानंदच्या एन. सी. सी छात्रांची परंपरा आणि पर्यावरण पूरक पदभ्रमंती
By nisha patil - 9/9/2026 3:20:22 PM
Share This News:
विवेकानंदच्या एन. सी. सी छात्रांची परंपरा आणि पर्यावरण पूरक पदभ्रमंती
कोल्हापूर. दि. 09 : भारतीय संस्कृतीमध्ये सण आणि उत्सव यांची वेगळी मांडणी आणि ठेवण आहे .सण आणि उत्सवांमधून संस्कृती एका पिढीकडून पुढच्या पिढ्यांकडे प्रवाहित होते. ज्यामुळे परंपरा मूल्य हे संग्रहणासोबत वर्धनास लागतात. श्रावण महिन्यामध्ये हिंदू रीतीरिवाजांद्वारे निरनिराळ्या धार्मिक स्थळांना भक्ती भवानी भेटी देऊन सन उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. धार्मिक स्थळांजवळ भेटी देणाऱ्यांचा वाढणारा ओघ स्थानिक परिसंस्था आणि पर्यावरणाला हानिकारक होऊ नये याकरिता विवेकानंद कॉलेज कोल्हापूर मधील एनसीसीच्या छात्रानी हातकणंगले तालुक्यातील अल्लमप्रभू रामलिंग आणि धुळोबा या ठिकाणी पदभ्रमंतीसोबत कचरा संकलन ही मोहीम राबविली.
श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी झालेली अलोट गर्दी आणि त्यामुळे निर्माण झालेली निर्माल्य व कचरा छात्रानी संकलित केला. सदरच्या पदभ्रमंतीमध्ये अतिग्रे तलाव परिसर आणि सह्याद्रीच्या . उपरांगांच्या शंभू टेकड्यांमधील जैवविविधते सोबत परिसंस्थेचे देखील शास्त्रीय अवलोकन करण्यात आले .
सदरच्या पदभ्रमंतीचे आयोजन एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा प्रा. नम्रता नरेवाडीकर यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद हुजरे, ज्युनियर आर्ट्स कॉमर्स विभाग प्रमुख प्रा सौ शिल्पा भोसले पाच महाराष्ट्र एनसीसी बटालियन चे कमांडिंग ऑफिसर कर्नल मानस दीक्षित, प्रबंधक श्री सचिन धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पूर्ण केले.सदरच्या पदभ्रमंतीसाठी छात्रसैनिक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.
विवेकानंदच्या एन. सी. सी छात्रांची परंपरा आणि पर्यावरण पूरक पदभ्रमंती
|