बातम्या

येवती ग्रामपंचायतीने 5 वर्षात मुस्लिम समाजाला एक रुपयाचाही निधी दिला नाही; मुस्लिम समाज आक्रमक, सरपंच व ग्रामसेवकांवर नाराजी

The Yevati Gram Panchayat has not allocated even


By nisha patil - 8/19/2026 6:08:18 PM
Share This News:



येवती ग्रामपंचायतीने 5 वर्षात मुस्लिम समाजाला एक रुपयाचाही निधी दिला नाही; मुस्लिम समाज आक्रमक, सरपंच व ग्रामसेवकांवर नाराजी

कागल प्रतिनिधी अजित बोडके ता. करवीर, जि. कोल्हापूर - येवती (ता. करवीर, जि. कोल्हापूर) ग्रामपंचायतीकडून गेल्या 5 वर्षांपासून मुस्लिम समाजाच्या वस्तीतील विकासकामांसाठी एकही निधी उपलब्ध करून दिला नसल्याचा गंभीर आरोप मुस्लिम समाज बांधवांनी केला आहे. यामुळे समाजात तीव्र नाराजी पसरली असून ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

गावातील मुस्लिम वस्तीमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, समाज मंदिर दुरुस्ती, स्मशानभूमी / दफनभूमीकडे जाणारा रस्ता अशा कोणत्याच कामासाठी ग्रामपंचायतीने निधीची तरतूद केली नाही. ग्रामसेवक आणि सरपंच यांनी वारंवार मागणी करूनही केवळ आश्वासन दिले, प्रत्यक्षात कामाची पूर्तता केली नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

निधी उपलब्ध असूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत, मुस्लिम समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. लवकरात लवकर ग्रामपंचायतीने दखल घेऊन मूलभूत उपाययोजना कराव्यात आणि प्रलंबित निधी वाटप करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मुस्लिम समाज  यांच्यावतीने इशारा दिला आहे की, जर तातडीने कार्यवाही झाली नाही तर पंचायत समिती करवीर आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार व आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल.

 


येवती ग्रामपंचायतीने 5 वर्षात मुस्लिम समाजाला एक रुपयाचाही निधी दिला नाही; मुस्लिम समाज आक्रमक, सरपंच व ग्रामसेवकांवर नाराजी
Total Views: 19