बातम्या
प्रस्तावित सैनिक टाकळी एमआयडीसी नोटिफिकेशन मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही .
By nisha patil - 7/8/2026 3:49:59 PM
Share This News:
प्रस्तावित सैनिक टाकळी एमआयडीसी नोटिफिकेशन मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही .
9 ऑगस्ट चा मोर्चा हा निघणारच.
आज प्रस्तावित सैनिक टाकळी एमआयडीसी विरोधात 9ऑगस्ट रोजी क्रांती दिनी निघणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. गोरे साहेब तसेच कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक संतोष मानेसो यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यालयामध्ये बैठक घेतली.
बैठकीमध्ये आंदोलकांनी एमआयडीसी चा निर्णय आमदारांनी घ्यावा. त्यासाठी गेली महिनाभर आम्ही वरिष्ठ स्तरावर मीटिंग घ्यावी असं मागणी आंदोलन कृती धनाजी चुडमुंगे यांनी केली. यावर बराच वेळ चर्चा होऊन आमदारांनी मीटिंग लावतो असं तोंडी आश्वासन दिलं. पण आंदोलकांनी जोपर्यंत वरिष्ठ स्तरावर एमआयडीसी रद्द होण्यासंदर्भात बैठकीचे लेखी आश्वासन मिळत नाही आंदोलनाचा पवित्रा कायम राहणार. त्यामुळें नऊ ऑगस्ट रोजी सैनिक टाकळी येथून आमदारांच्या कार्यालयावर मोर्चा हा निघणारच असा इशारा आंदोलन कुठे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी दिला.
त्यामुळे तालुक्यातील सर्व समविचारी पक्ष संघटना यांनी 9 ऑगस्ट क्रांती दिनी मोर्चासाठी सकाळी ठीक दहा वाजता अमर जवान हुतात्मा स्मारक टाकळी या ठिकाणी उपस्थित राहावे असा आवाहन करण्यात आले यावेळी राकेश जगदाळे ,विनोद पाटील ,रिटा.वायुसैनिक अमर पाटील, प्रदीप पाटील, नवनाथ पाटील ,रिटा.हवालदार नितिन पाटील इ. टाकळी जल जमीन बचाव कृती समिती, माजी सैनिक संघटना ,आंदोलन अंकुश संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रस्तावित सैनिक टाकळी एमआयडीसी नोटिफिकेशन मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही .
|