बातम्या
असीम त्याग, बलिदानाचे प्रतिक म्हणजे पावनखिंडचा रणसंग्राम - प्राचार्य अभयकुमार साळुंखे
By nisha patil - 5/8/2026 12:12:58 PM
Share This News:
असीम त्याग, बलिदानाचे प्रतिक म्हणजे पावनखिंडचा रणसंग्राम - प्राचार्य अभयकुमार साळुंखे
कोल्हापूर दि.5 : "बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे, वीर शिवा काशीद आणि शेकडो मावळ्यांच्या असीम त्याग, बलीदानामधून स्वराज्य निर्मितीचा मार्ग सुकर झाला. स्वराज्यासाठी त्यांनी दिलेले बलिदान भावी पिढीस समजावे, त्याची जाणीव रहावी म्हणून युवकांसाठी अशा मोहिमा गरजेच्या आहेत. "असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरचे कार्याध्यक्ष म.प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी केले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचालित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी आणि दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, इचलकरंजीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित पन्हाळा-पावनखिंड शिवशौर्यगाथा पदभ्रमंती मोहीम जवळपास २०० विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागाने संपन्न झाली. सदर मोहिमेचे उद्घाटन श्री स्वामी विवेकानंद शिक्षणा संस्था, कोल्हापूरचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली आणि पन्हाळा नगराध्यक्षा मा. श्रीमती जयश्री पोवार, उपनगराध्यक्ष मा. सतीश भोसले, माजी उपनगराध्यक्ष मा. चेतन भोसले आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे जवळपास १२० हून ज्यादा विद्यार्थीनीनी हा खडतर ट्रॅक पूर्ण केला.
स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या बाजीप्रभू देशपांडे आणि शूर मावळ्यांच्या बलिदानास नमन म्हणून सदस मोहिमेचे आयोजन करण्यात आले. पन्हाळा राजदिंडी मार्गावरून सुरु झालेली ही पदभ्रमंती मोहीम मसाईच्या विस्तीणी पठारावरून प्रचंड पाऊस, चिखल, दलदलीतून मार्ग काढत अनेक छोटी गावे पार करत करपेवाडी येथे मुक्काम करण्यात आला. दरम्यान मसाई पठार येथे डी. के. ए. एस. सी. कॉलेज इचलकरंजीचे वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा डॉ. संदीप गावडे यांनी अत्यंत दुर्मिळ फुलांची माहिती सांगताना तेथील जैवविविधतेचे महत्व विषद केले. संध्याकाळ करपेवाडी येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते प्रा. मधुकर पाटील यांचे "पावनखिंडीचा रणसंग्राम" या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. यावेळी विवेकानंद महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप पाटील प्रमुख उपस्थित होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी ऐतिहासिक गाणी, काव्ये, शाहिरी सादरीकरण विद्यार्थ्याकडून सादर झाले. त्यानंत करपेवाडी ते पांढरपाणी हा टप्पा यशस्वीपणे पूर्ण करून पावनखिंडीत या मोहिमेचा समारोप झाला. सदर मोहिमेन श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजीच्या प्र. प्राचार्य डॉ. श्रुती जोशी, दोन्ह महाविद्यालयाचे एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. सुनील भोसले, डॉ. धीरज शिंदे, प्रा. अंकुश कुरणे, प्रा. स्वात्त हळवणकर, प्रा. निशा सुर्वे, प्रा. रोहिणी रेळेकर, प्रा. राहूल कांबळे, प्रा. संदीप पाटील, प्रा. निलेश जाधव, डॉ. सुभा जाधव, प्रा. पूजा परिशवाड, प्रा. वर्षा शिंदे, प्रा. रुपाली सांबरे, डॉ महबूब माणगावे, डॉ संदीप लोखंडे यांनी सक्री सहभाग नोंदवला. सदर मोहिमेस श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा कौस्तुभ गावडे, डी. के. ए. एस. सी. कॉलेजचे प्राचार्य प्रो डॉ एस के खाडे यांचे प्रोत्साहन लाभले.
असीम त्याग, बलिदानाचे प्रतिक म्हणजे पावनखिंडचा रणसंग्राम - प्राचार्य अभयकुमार साळुंखे
|