बातम्या

*हिरण्यकेशी नदीवरील भडगाव नविन पुल अखेर पूर्णं वाहतुकीस केला खुला

The new Bhadgaon bridge over the Hiranyakeshi River


By nisha patil - 7/28/2026 3:16:28 PM
Share This News:



*हिरण्यकेशी नदीवरील भडगाव नविन पुल अखेर पूर्णं वाहतुकीस केला खुला
 

आजरा(हसन तकीलदार):-आज मंगळवार दिनांक २८/७/२०२६रोजी सकाळ पासून  भडगाव हिरण्यकेशी नविन पुलावरुन एसटी वाहतूक सुरू झाली आहे. गडहिंग्लज,चंदगड, आजरा, दोडामार्ग यांना जोडणारा मुख्य पुल म्हणजे भडगाव पूल होय, जुन्या पूलाची उंची कमी असल्यामुळे अतिवृष्टीत जुन्या पुलावर  सतत आणि वरचेवर  पाणी येत होते त्यामूळे दळण - वळण चा गंभीर प्रश्न निर्माण होत होता मग आठवडी बाजार, शाळा कॉलेज चे विद्यार्थी,रुग्ण तसेच शासकीय कार्यालयातील कामे यांना वेळोवेळी अडथळे  येत होता

आणि लोकांचे जीवन विस्कळीत होते म्हणून  खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, नाम.हसन मुश्रीफ तसेच चंदगड विधानसभेचे आमदार  शिवाजी पाटील यांच्या अथक प्रयत्नातून आणि जनतेच्या सहकार्यातून तसेच प्रांताधिकारी , तहसिलदार, संबंधित ठेकेदार,बांधकामविभागचे पदाधिकारी प्रसार माध्यमे यांची वेळोवेळी बैठका लावून लवकरात लवकर पुलाचे काम कसे पूर्ण करता येईल यांचे तंतोतत नियोजन लावून अखेर  मंगळवार दि . २८ जुलै पासून वाहतूक सुरळीत सुरु झाल्यामूळे लोकांच्यामधून समाधान व्यक्त केले जात आहे.  पुलाच्या कामासाठी विविध संघटना व पक्षानी अंदोलन ही केली होती परंतू हेतू एकच होता पुलाचे काम लवकर झाले पाहिजे.


*हिरण्यकेशी नदीवरील भडगाव नविन पुल अखेर पूर्णं वाहतुकीस केला खुला
Total Views: 79