राजकीय
“जनतेला काटकसरीचा सल्ला, सत्ताधाऱ्यांची मात्र उधळपट्टी;
By nisha patil - 5/13/2026 4:15:15 PM
Share This News:
“जनतेला काटकसरीचा सल्ला, सत्ताधाऱ्यांची मात्र उधळपट्टी; “महागाई, इंधन दरवाढ आणि आर्थिक संकटावरून केंद्र-राज्य सरकारला काँग्रेसचे थेट सवाल”
“हे सरकार की इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी? काँग्रेसचा मोदी-फडणवीस सरकारवर हल्लाबोल”
देशातील वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि ऊर्जा संकट हाताळण्यात केंद्र व राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला काटकसर करण्याचा दिलेला सल्ला हा सरकारच्या अपयशाची कबुली असल्याची टीका करण्यात आली.
काँग्रेसने म्हटले आहे की, सामान्य जनतेला पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन करणारे सत्ताधारी स्वतः मात्र मोठ्या ताफ्यांतून फिरत आहेत, हेलिकॉप्टर व चार्टर्ड विमानांवर कोट्यवधींचा खर्च करत आहेत. पेट्रोल-डिझेलवरील करातून सरकारने जमा केलेला पैसा जनतेला दिलासा देण्यासाठी वापरला जात नसल्याचा सवालही करण्यात आला.
महागाईमुळे सामान्य नागरिक, शेतकरी, तरुण आणि गृहिणी आर्थिक संकटात सापडले असून सरकारकडे ना ठोस धोरण आहे ना दिशा, अशी टीका काँग्रेसने केली. तसेच, कोल्हापूरच्या शेतकऱ्यांवर अन्याय करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी करत काँग्रेसने सरकारच्या “सल्ला वजा आवाहनाचा” तीव्र निषेध नोंदविला.
“हे सरकार की इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी? काँग्रेसचा मोदी-फडणवीस सरकारवर हल्लाबोल”
|