बातम्या

ये राखी बंधन है ऐसा.....        पंत वालावलकर हायस्कूलचे अनोखे रक्षाबंधन                

This Rakhi Bandhan is like this


By nisha patil - 8/26/2026 11:48:04 PM
Share This News:



ये राखी बंधन है ऐसा.....        पंत वालावलकर हायस्कूलचे अनोखे रक्षाबंधन                

कोल्हापूर   :    मुक्त सैनिक विद्यापीठांतर्गत असणाऱ्या आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित शांकरू पंत वालावलकर हायस्कूल मध्ये शाळेच्या विद्यार्थिनींनी कलाशिक्षक विश्वास माळी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्स्फूर्तपणे राख्या तयार करून रक्षाबंधनादिवशी या राख्या देशासाठी आपले योगदान देऊन रक्षण करणारे जवान, निवारा नसणारे आणि फुटपाथलाच आपले घर समजून गुजराण करणारे अनाथ आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता भरभरून ऑक्सिजन पुरणारे वृक्ष यांना राखी बांधून रक्षाबंधन आणि पर्यावरण रक्षणासाठी वृक्षा बंधन असा अनोखा संकल्प केला आहे .

यासाठी उपलब्ध कच्च्या साहित्याद्वारे शाळेमध्ये राखी तयार करण्याचा उपक्रम आणि याबरोबरच रक्षाबंधन :  एक नवी आशा हा संकल्प करून तो तडीस नेणार असल्याची माहिती शां. कृ . पंत वालावलकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी दिली . या मोहिमेत आवाहन केल्यानंतर उत्स्फूर्त सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले . भविष्यात सजग नागरिकत्वासाठीचे हे योगदान निश्चितच सामाजिक जाणिवा जपून खऱ्या अर्थाने आंतर भारतीयत्व सार्थ ठरवतील असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला . पर्यवेक्षिका सरिता शिंदे यांनीही विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले . या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी मनमोहक राख्या तयार केल्या आणि यासाठी अत्यंत कमी खर्च आल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली . कार्यशाळेस ज्येष्ठ शिक्षक सुनील साजणे, संतोष पोवार, बाळासो कागले, राजेंद्र बनसोडे, प्रशांत भोसले, जयवंत साखरे, शीतल कपिलेश्वरी, शीतल अलमान यांनी भेट देवून विद्यार्थ्यांचे कौतूक केले . एकंदरीत शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलचा " ये राखी बंधन है ऐसा... "  हा उपक्रम सामाजिक जाणिवेचे दृढीकरण करणारा ठरेल यात शंका नाही .


ये राखी बंधन है ऐसा.....        पंत वालावलकर हायस्कूलचे अनोखे रक्षाबंधन                
Total Views: 27