ताज्या बातम्या
आजऱ्यातील धुळीच्या त्रासाने व्यापारी हैराण; नगरपंचायतीला पाण्याचे टँकर सुरू करण्याचे निवेदन
By nisha patil - 11/2/2026 3:37:50 PM
Share This News:
आजऱ्यातील धुळीच्या त्रासाने व्यापारी हैराण; नगरपंचायतीला पाण्याचे टँकर सुरू करण्याचे निवेदन
आजरा(हसन तकीलदार) :- आजरा शहरात सध्या सुरू असलेल्या विविध विकासकामामुळे धुळीचे साम्राज्य पसरले असून, याचा मोठा फटका बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना आणि नागरिकांच्या आरोग्याला बसत आहे. दुकानात आणि दुकानांच्या साहित्यावर धूळ बसून नुकसान होत आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आजरा शहर एकसंघ व्यापारी असोसिएशनच्या वतीने आजरा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी आणि उपनगराध्यक्षा सौ. डोंगरे यांना निवेदन देण्यात आले.
धुळीमुळे व्यवसायाचे नुकसान आणि आरोग्याचे प्रश्न
निवेदनात नमूद करण्यात आली आहेत. सध्या आजरा शहरात रस्त्याची कामे, पाणी योजना, पाईपलाईन आणि गटारींची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. सर्वत्र खुदाई झाल्यामुळे वातावरणात धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. याचा थेट परिणाम बाजारपेठेतील दुकानांमधील साहित्यावर होत असून व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच, सततच्या धुळीमुळे श्वसनाचे विकार, सर्दी खोकला यासारखे आजार वाढले असून नागरिक आजारी पडत असल्याचेही असोसिएशनने निवेदनात म्हटले आहे.
त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी नगरपंचायतीच्या वतीने दिवसातून २ ते ३ वेळा पाण्याचे टँकर मारण्यात यावेत. अशी मागणी व्यापारी असोसिएशनने निवेदनातून केली आहे त्याचप्रमाणे मुख्यबाजारपेठेतील रस्ता लवकरात लवकर करावा अशीही मागणी नागरिकांतून होताना दिसत आहे. यामुळे नागरिकांना आणि दुकानदारांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
यावेळी
निवेदन देताना व्यापारी असोसिएशनचे
महेश नार्वेकर (अध्यक्ष)
वाय. जी. इंजल (उपाध्यक्ष)
राजेश विभूते (सचिव)
संजय हरेर (खजिनदार)
सचिन इंदुलकर, वृषाल हुक्केरी, मल्लिकार्जुन तेरणी, महान्तेश गुंजाटी, दाऊदसाहेब लमतुरे, बाळू पाचवडेकर (सदस्य)
अश्विन डोंगरे, समीर चाँद, गिरीश पाटील, अभिजीत रांगणेकर,
शरीफ खेडेकर(सामाजिक कार्यकर्ते) आदिजण उपस्थित होते.
आजऱ्यातील धुळीच्या त्रासाने व्यापारी हैराण; नगरपंचायतीला पाण्याचे टँकर सुरू करण्याचे निवेदन
|