बातम्या
*चंदगड तालुक्यातील तांबूळवाडी येथील 18 वर्षीय युवकाचा सवतकडा धबधबा येथे बुडून दुर्दैवी अंत
By nisha patil - 10/8/2026 12:41:46 PM
Share This News:
*चंदगड तालुक्यातील तांबूळवाडी येथील 18 वर्षीय युवकाचा सवतकडा धबधबा येथे बुडून दुर्दैवी अंत
आजरा(हसन तकीलदार):- चंदगड तालुक्यातील तांबुळवाडी येथील 18 वर्षीय तरुणाचा भुदरगड तालुक्यातील सवतकडा धबधबा परिसरातील मंडपिकडा येथे बुडून दुर्दैंवी मृत्यू झाला. युसूफ मेहबूब शेख असे मृत तरुणांचे नाव असून, तो इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत होता.रविवारी दुपारी सुमारे 4.45 वाजण्याच्या सुमारास ही दूर्घटना घडली.
भुदरगड तालुक्यातील गारगोटी वनपरीक्षेत्रात नितवडे, दोनवडे व खेडगे गावच्या हद्दीत सवतकडा धबधबा हे पर्यटनस्थळ प्रसिद्ध आहे. एकाच परिसरात सात धबधबे आणि हिरवेगार जंगल हे मुख्य आकर्षण आहे.वनविभागातर्फे येथे साहसीखेळ व सुविधा सुरु केल्यामुळे येथे पर्यटक आकर्षित होतात.
सवतकडा धबधबा परिसरात पर्यटनासाठी आपल्या कुटुंबासोबत आलेल्या युसूफचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली.रात्रीच्या वेळी शोध मोहिमेस अडथळा येत असल्याने उद्या सकाळी शोध मोहीम सुरु करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले.
पर्यटनातून महसूल मिळतो पण सुरक्षेची काय व्यवस्था ?सवतकडा धबधबा परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात.पर्यटनाच्या माध्यमातून वनविभागाला दररोज मोठ्या प्रमाणात महसूल जमा होत असल्याचे सांगितले जाते. पर्यटकांच्या तिकीट विक्रीतून दररोज लाखो रुपयांचा महसूल मिळत असताना, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पुरेशा उपाययोजना आहेत का ?
असा गंभीर सवाल आता उपस्थित होत आहे. स्थानिक नागरिकांकडून वनविभागाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्र उपस्थित केला जात आहे. 'पर्यटकांकडून तिकीट वसूली करण्यापुरतेच
वनविभागाचे लक्ष आहे का ?' असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासन आणि वनविभागाने केवळ प्रवेश शुल्क वसूल न करता पर्यट्कांच्या जीविताच्या सुरक्षिततेची जबाबदारीही गांभीर्याने घेणे गरजेचे आहे अशी भावना नागारिकांमधून व्यक्त होत आहे.
*चंदगड तालुक्यातील तांबूळवाडी येथील 18 वर्षीय युवकाचा सवतकडा धबधबा येथे बुडून दुर्दैवी अंत
|