बातम्या

अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात अभिवादन

Tribute paid to Ajit Pawar at Shivaji University


By nisha patil - 7/22/2026 4:20:03 PM
Share This News:



अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात अभिवादन

कोल्हापूर, दि. २२ जुलै: महाराष्ट्राचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात आज त्यांच्या पवित्र स्मृतींना प्रतिमापूजनाने अभिवादन करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांच्या हस्ते अजित अनंतराव पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर, उपस्थितांनीही पुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, कै. श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनाच्या समन्वयक डॉ. भारती पाटील,  राज्यशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. प्रकाश पवार, डॉ. उत्तम सकट, गजानन पळसे, अजित चौगुले, डॉ.अजित कोळेकर, डॉ.धनंजय सुतार, डॉ.शिवराज थोरात, डॉ.मच्ंछिद्र गोफणे, डॉ. नेहा वाडेकर, डॉ. कबीर खराडे, सुरेश बंडगर, अनिल साळोखे यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात अभिवादन
Total Views: 17