बातम्या
शहाजी महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे यांना जयंती दिनानिमित्त अभिवादन
By nisha patil - 1/8/2026 7:32:27 PM
Share This News:
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याकडे समाजतत्वचिंतक म्हणून पहावे : डॉ.आर.के.शानेदिवाण
शहाजी महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे यांना जयंती दिनानिमित्त अभिवादन
कोल्हापूर :लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याकडे समाजतत्वचिंतक म्हणून पहावे. त्यांच्या साहित्यातून माणूस, त्याचे कष्ट,दारिद्र्य आणि त्यावर समाज व्यवस्थेने लादलेल्या अनिष्ट रूढी परंपरा, त्याचे समाज व्यवस्थेने केलेले शोषण याचे ज्वलंत दर्शन घडते. त्यामुळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ लोकशाहीर नव्हते तर ते समाजतत्वचिंतक होते असे प्रतिपादन श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण यांनी केले. लोकशाहीर ,विश्वरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते .
प्रारंभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती दिनानिमित्त व लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.
डॉ.आर.के.शानेदिवाण म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी विदारक समाज व्यवस्थेचे, माणसांचे चित्रण केले. माणसानेच माणसाला गुलाम केल्याचे, त्याचे हक्क, अधिकार घेऊन उच्चवर्णीयांनी आयशाराम जीवन जगलयाचे त्यांनी यावेळी सांगितले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अण्णाभाऊ साठे यांच्याप्रमाणे अमर शेख व इतरांचेही मोठे योगदान आहे. आजच्या परिस्थितीतही अण्णाभाऊंचे विचार अत्यंत उपयोगी आहेत, राजकारण्यांनी केवळ देवधर्माकडे न जाता माणूस उभा करण्याचे काम करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे या उपक्रमांस प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळाले.
स्वागत व प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. डी. के. वळवी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.शोभा चाळके-म्हमाने यांनी केले. आभार डॉ. शिवाजी रायजादे यांनी मानले.
डॉ.आर.डी.मांडणीकर, डॉ. के. एम. देसाई, प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. शिवाजी ग्रंथालयाच्या वतीने यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावरील ग्रंथसंपदेचे ग्रंथ प्रदर्शन संपन्न झाले.
42 विद्यार्थ्यांनी लेखन उपक्रमात सहभाग नोंदवून अण्णाभाऊंच्या साहित्यावर लेखन केले. डॉ.डी.के.वळवी, ग्रंथपाल डॉ. पांडुरंग पाटील, प्रा.पी.के.पाटील यांनी संयोजन केले.
शहाजी महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे यांना जयंती दिनानिमित्त अभिवादन
|