बातम्या
छत्रपती राजाराम महाराज यांना जयंती दिनानिमित्त शहाजी महाविद्यालयात अभिवादन
By nisha patil - 7/31/2026 7:32:13 PM
Share This News:
छत्रपती राजाराम महाराज यांना जयंती दिनानिमित्त शहाजी महाविद्यालयात अभिवादन
कोल्हापूर : दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात कोल्हापूर संस्थानचे छत्रपती राजाराम महाराज यांना 129 व्या जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. शिवाजी ग्रंथालयातील राजाराम महाराज यांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून यावेळी अभिवादन करण्यात आले
या निमित्ताने इतिहास विभागातील प्राध्यापिका डॉ. सौ.पुनम भुयेकर - शिंदे यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या सामाजिक सुधारणा या विषयावर मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे या कार्यक्रमास मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळालेडॉ.भुयेकर म्हणाल्या, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे अपूर्ण राहिलेले काम छत्रपती राजाराम महाराजांनी पुढे नेले. शाहू महाराजांचा सामाजिक कार्याचा वारसा त्यांनी अखंडपणे पुढे चालवला. त्यांनी स्त्रियांना आत्मसन्मान मिळवूण देणेसाठी अनेक कायदे व अध्यादेश काढले. अस्पृश्यता निर्मूलन अंधश्रद्धा निर्मूलन करून देवाच्या नावावर मुरळी पद्धत बंद केली. सामाजिक सुधारण्यासाठी अनेक कामे त्यांनी केली.
स्वागत, प्रास्ताविक डॉ. शिवाजी रायजादे यांनी केले .प्रा.ए.आर. पराळे यांनी आभार मानले.
श्री .आय क्यू ए सी समन्वयक डॉ. आर.डी. मांडणीकर डॉ. ए .बी.बलुगडे,डॉ. के. एम. देसाई,डॉ.सुरेश शिखरे,अधीक्षक मनीष भोसले, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
छत्रपती राजाराम महाराज यांना जयंती दिनानिमित्त शहाजी महाविद्यालयात अभिवादन
|