बातम्या

*व्यंकटराव संकुलात मृत्युंजकरांना अभिवादन

Tribute paid to Mrutyunjaykar at Vyankatrao Sankul


By nisha patil - 8/31/2026 8:39:40 PM
Share This News:



*व्यंकटराव संकुलात मृत्युंजकरांना अभिवादन

व्यंकटराव हायस्कूलचे नाव सातासमुद्रापार नेणारे 'मृत्युंजयकार' हे आजराच्या मातीतील हिरा: -जयवंतराव शिंपी

*आजरा (हसन तकीलदार)*:- व्यंकटराव शिक्षण संकुल येथे सोमवार, दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी व्यंकटराव प्रशालेचे माजी विद्यार्थी व जगप्रसिद्ध साहित्यिक 'मृत्युंजयकार' शिवाजीराव सावंत यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते शिवाजीराव सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

यानंतर  आर. पी. होरटे यांनी आपल्या मनोगतातून शिवाजीराव सावंत यांच्या जीवनप्रवासाचा आणि साहित्यिक कार्याचा सखोल आढावा घेतला.
​अध्यक्षीय भाषणात बोलताना जयवंतराव शिंपी म्हणाले, "शिवाजीराव सावंत हे आजऱ्याच्या लाल मातीतील एक अमूल्य हिरा होते. आमच्या संस्थाकालीन व्यंकटराव प्रशालेतच त्यांच्यातील गुणांवर पैलू पाडण्याचे ऐतिहासिक कार्य झाले. त्यांच्यातील लेखनशैली आणि नाट्यकलेला प्रोत्साहन देऊन शाळेने त्यांना विविध व्यासपीठे उपलब्ध करून दिली.

विद्यार्थीदशेत मिळालेल्या या संधीमुळेच त्यांच्यात धाडस व आत्मविश्वास निर्माण झाला." पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, कोल्हापूर येथे पुढील उच्च शिक्षण घेत असताना आणि आयुष्यभर प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही शिवाजीराव सावंत यांनी आपल्या मायभूमीशी व व्यंकटराव प्रशालेशी असलेले नाते अखेरच्या श्वासापर्यंत घट्ट जपले. त्यांच्या जागतिक दर्जाच्या साहित्यामुळेच व्यंकटराव हायस्कूलचे नाव सातासमुद्रापार पोहोचले आहे.

या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष कृष्णा पटेकर, सचिव अभिषेक शिंपी, खजिनदार सुनील पाटील, संचालक  सचिन शिंपी,  सुधीर जाधव,अशोक पोवार यांच्यासह प्रशालेचे प्राचार्य  एस. एन. पाटील, पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार, ज्युनिअर कॉलेजचे प्रभारी प्राचार्य पन्हाळकर, क्रीडा शिक्षक पांडुरंग तेरसे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक आर. व्ही. देसाई यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


*व्यंकटराव संकुलात मृत्युंजकरांना अभिवादन
Total Views: 11