बातम्या
पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील यांना शहाजी महाविद्यालयात श्रद्धांजली.
By nisha patil - 6/8/2026 2:09:39 PM
Share This News:
पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील यांना शहाजी महाविद्यालयात श्रद्धांजली.
कोल्हापूर : श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण श्रद्धांजली सभेत बोलताना म्हणाले, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या जाण्याने ज्ञानगंगेचा भगीरथ कालवश झाला. डीवाय. दादांनी विना अनुदानित महाविद्यालयांना प्रतिष्ठा मिळवून दिली. लाखो विद्यार्थी त्याच्या संस्थेतून बाहेर पडून स्वालंबी बनले. देशभरातील शिक्षण संस्थांमध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे मार्गदर्शन मिळाले.
माजी प्राचार्य डॉ. जी.पी. माळी, लेखक प्रा.शशिकांत चौधरी,डॉ. आर डी मांडणीकर, डॉ.ए.बी.बलुगडे,डॉ.के.एम.देसाई, डॉ.डी.के.वळवी, प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले, ग्रंथपाल डॉ. पांडुरंग पाटील, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी यावेळी उपस्थित होते. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे सभागृहात हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला.
पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील यांना शहाजी महाविद्यालयात श्रद्धांजली.
|