बातम्या
वालावलकर हायस्कूलमध्ये ययातिकार वि.स.खांडेकर यांना अभिवादन
By nisha patil - 2/9/2026 11:22:49 PM
Share This News:
वालावलकर हायस्कूलमध्ये ययातिकार वि.स.खांडेकर यांना अभिवादन
कोल्हापूर : मुक्तसैनिक विद्यापीठांतर्गत असणाऱ्या आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित शांतारामपंत वालावलकर हायस्कूलमध्ये मराठीतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक आणि ययातिकार वि.स.खांडेकर यांच्या पन्नासाव्या स्मृतिदिना निमित्त अभिवादन करण्यात आले . मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांच्या हस्ते प्रतिमापूजन आणि भित्तीपत्रकाचे पूजन करण्यात आले .
इयत्ता ८ वी ड चे वर्गशिक्षक विश्वास माळी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले . सना चौधरी, स्वरूप पाटील, समर्थ खराडे, संस्कृती कुंभार, पायल ठाकरे, प्रिती पाटील, स्वरा पोवार यांनी मनोगत व्यक्त केले . प्रमुख वक्त्या पर्यवेक्षिका सरिता शिंदे यांनी वि.स.खांडेकर लेखक आणि व्यक्ती यावरती आपल्या मनोगतातून भाष्य केले . प्रारंभी हायस्कूलच्या गीतमंच च्या विद्यार्थीनींनी एकच पणती मिणमिणती हे गीत गाऊन वि.स.खांडेकर यांना अभिवादन केले. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब कागले, सुनिल साजणे, समीर जमादार, राजेंद्र बनसोडे, शितल कपिलेश्वरी, संजीत सनगर, निर्मला शेळके, संभाजी भातमारे, काजल चव्हाण, प्रविणा खोत, अरविंद गवळी व श्रीमती महाराणी ताराराणी अध्यापक महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रविण चाकोते व छात्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
वालावलकर हायस्कूलमध्ये ययातिकार वि.स.खांडेकर यांना अभिवादन
|