बातम्या
*आजऱ्यात वनहुतात्मा दिनानिमित्त वनमजूर कै. प्रकाश पाटील यांना अभिवादन
By nisha patil - 11/9/2026 11:08:27 PM
Share This News:
*आजऱ्यात वनहुतात्मा दिनानिमित्त वनमजूर कै. प्रकाश पाटील यांना अभिवादन
*आजरा(हसन तकीलदार):-जंगल, वन्यजीव आणि पर्यावरणाचे रक्षण करताना आपले प्राण अर्पण करणाऱ्या शूर वनरक्षक, अधिकारी व स्थानिकांना राष्ट्रीय वन हुतात्मा दिनादिवशी आदरांजली वाहिली जाते. त्यानुसार वनमजूर कै. प्रकाश पाटील यांच्या स्मारकासमोर अभिवादन करण्यात आले.
ऑक्टोबर 2023 रोजी टस्कर हत्तीच्या अचानक झालेल्या हल्ल्यात वनमजूर प्रकाश गोविंद पाटील (रा. गवसे,ता. आजरा)यांचा मृत्यू झाला होता. घाटकरवाडी येथे हत्तीला हुस्कावताना आपले कर्तव्य बजावताना टस्कर हत्तीने वनमजूर प्रकाश पाटील यांच्यावर अचानक हल्ला केला होता. यात त्यांनी आपले प्राण अर्पण केले होते. राष्ट्रीय वन हुतात्मा दिनानिमित्त पंचायत समितीच्या प्रभारी सभापती यशोदा पोवार यांनी आजरा वन विभाग कार्यालयाजवळील प्रकाश पाटील यांच्या स्मारकास अभिवादन केले.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख युवराज पोवार, संग्रामसिंह खापरे, संजय पिसे, तानाजी पेडणेकर, शिवाजी मस्कर, लक्ष्मण माडभगत, धाकू कविटकर आदिजण उपस्थित होते.
*आजऱ्यात वनहुतात्मा दिनानिमित्त वनमजूर कै. प्रकाश पाटील यांना अभिवादन
|