बातम्या
आजच्या काळासाठी तुकोबा या ग्रंथावर मंगळवारी आजऱ्यात चर्चासत्र
By nisha patil - 7/8/2026 11:56:04 PM
Share This News:
**आजच्या काळासाठी तुकोबा या ग्रंथावर मंगळवारी आजऱ्यात चर्चासत्र*
**शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर रणवीर शिंदे करणार प्रमुख मांडणी*
*आजरा(हसन तकीलदार)*:-हभप देवदत्त परूळेकर यांनी लिहिलेल्या "आजच्या काळासाठी तुकोबा" या ग्रंथावर मंगळवार दिनांक ११ रोजी आजरा येथे विशेष चर्चासत्राचे आयोजन केले आहे. मुकुंददादा देसाई (चेअरमन आजरा साखर कारखाना)यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात प्राध्यापक सुनील शिंत्रे व सुभाष विभुते हे सहभाग घेणार आहेत. याबरोबरच ग्रंथाचे लेखक व दांडेकर मामा दिंडीचे दिंडी प्रमुख हभप देवदत्त परूळेकर आणि प्रकाशक अजय कांडर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
वारकरी, महाविद्यालयीन मुले, अभ्यासक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते यांनी मंगळवारी जनता सहकारी बँकेच्या सभागृहात दुपारी ठीक 12:00 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री राम कृष्ण हरी वारकरी संप्रदायाचे संस्थेचे अध्यक्ष गौरव सुतार महाराज, गंगाराम येडगे यांनी केले आहे.
आजच्या काळासाठी तुकोबा या ग्रंथावर मंगळवारी आजऱ्यात चर्चासत्र
|