बातम्या
एम. डी. ड्रग्ससहित दोघांना पकडले
By nisha patil - 8/9/2026 2:21:16 PM
Share This News:
*एम. डी. ड्रग्ससहित दोघांना पकडले
*आजरा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषणची संयुक्त करावाई
*आजरा(हसन तकीलदार):-आज दि. 7/9/2026रोजी आजरा पोलीस ठाणे हद्दीत आजरा आंबोली रोडवरील शबाज फार्मकडे जाणाऱ्या रोडवर दोन इसम हे एम.डी.ड्रग्स घेऊन येणार आहेत अशी गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्या नेतृत्वाखाली आजरा पोलीस ठाणे पथक व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक असे दोन पंचासह संयुक्त कारवाईद्वारे सापळा रचून एम. डी. ड्रग्ज सह दोघांना अटक करण्यात यश आले आहे.
याबाबत पोलीस विभागकडून मिळालेली माहिती अशी की, एम. डी. ड्रग्ज घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार स. पो. नि. सरवदे यांच्या नेतृत्वाखाली आजरा पोलीस ठाण्याचे पथक व स्थानिक गुन्हे अन्वेषणशाखेचे पथक यांनी सापळा रचून 1) अन्वर असलम शेख, वय 34 वर्ष रा. सरनाईक वसाहत जवाहर नगर कोल्हापूर व 2) किरण दडप्पा माने, वय 33 वर्ष, रा. शिवाजी पार्क कोल्हापूर यांना 16 ग्रॅम एम.डी. पावडर, एक एक्सेस मोपेड स्कूटर व दोन मोबाईल सह ताब्यात घेण्यात आले आहे. तरी सदरबाबत एन.डी. पी.एस.कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत पोलीस करीत आहेत.
एम. डी. ड्रग्ससहित दोघांना पकडले
|